आजरा ः सत्कार कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः सत्कार कार्यक्रम
आजरा ः सत्कार कार्यक्रम

आजरा ः सत्कार कार्यक्रम

sakal_logo
By

आजरा पोलिसांचा उद्या सत्कार      

आजराः खानापूर या ठिकाणी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दरोडेखोरांना बारा तासांत मुद्देमालासह अटक करून जलद गतीने तपास केल्याबद्दल आजरा पोलिसांचा शुक्रवारी (ता.१२) सत्कार व कौतुक सोहळा होणार आहे. तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात दुपारी दीड वाजता कार्यक्रम होईल. विविध सामाजिक संस्था, संघटना, गुरव समाज व नागरिक यांच्या वतीने या तपासातील पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदारांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. सत्काराला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, कष्टकरी संघटना प्रतिनिधी व नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.