गडहिंग्लज तालुका संघासाठी १०९ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज तालुका संघासाठी १०९ अर्ज
गडहिंग्लज तालुका संघासाठी १०९ अर्ज

गडहिंग्लज तालुका संघासाठी १०९ अर्ज

sakal_logo
By

गडहिंग्लज तालुका संघासाठी १०९ अर्ज
गडहिंग्लज: गडहिंग्लज तालुका खरेदी-विक्री शेतकरी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवस अखेर १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज (ता. ११) दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आहे. तालुका खरेदी-विक्री संघ अलीकडील काही वर्षापासून आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. दरम्यान, या संस्थेच्या निवडणूक जाहीर झाली. बाजार समितीसुद्धा आर्थिक अडचणीत असल्याने त्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. आता तालुका संघाची निवडणूकही बिनविरोध करण्याची गरज असून त्यादिशेने सर्वपक्षींयाची वाटचाल आवश्यक आहे. गटनिहाय दाखल झालेले अर्ज : संस्था अ गट-४३, व्यक्ती गट-२८, महिला राखीव-१३, भटक्या विमुक्त जाती-जमाती गट- १२, अनुसुचित जाती जमाती-६ आणि इतर मागासवर्ग गट- ७.