मारहाणीत जखमी फिरस्त्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणीत जखमी फिरस्त्याचा मृत्यू
मारहाणीत जखमी फिरस्त्याचा मृत्यू

मारहाणीत जखमी फिरस्त्याचा मृत्यू

sakal_logo
By

01993
...


मारहाणीत जखमी झालेल्या फिरस्त्याचा मृत्यू

दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल ः दोन दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर, ता.१० ः दारुसाठी पैसे न दिल्याने दोघांनी आकाश नितीन मुळे (वय ३४, रा.कनाननगर, शाहूपुरी) या फिरस्त्याला गुरुवारी (ता.४) मध्यरात्री मारहाण केली. यामध्ये आकाश जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी (ता.९) रात्री त्यांचा मृत्यू झाला. यातील संशयित आरोपी अनिल गंगाराम हिरवे (वय ३३, रा.पुलाची शिरोली,ता. हातकणंगले) आणि उमेश बाळासाहेब सातपुते (वय ३२, रा. आर.के.नगर, गणपती मंदिरमागे) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोघांना शुक्रवार (ता.१२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि त्याचा मित्र रोहित तानाजी कोकितकर हे दोघे फिरस्ते आहेत. गुरुवारी (ता.४) रात्री ते अयोध्या टॉकीज जवळील पदपथावर झोपले होते. यावेळी तेथे अनिल आणि उमेश हे दोघे फिरस्ते आले. त्यांनी आकाश आणि रोहीतकडे दारूसाठी पैसे मागितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. अनिल आणि उमेश यांनी त्या दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथील सिमेंट, वाळू आणि विटांचा घट्ट झालेला लगदा आकाश मुळे याच्या पायावर मारला. यामध्ये आकाश जखमी झाला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी (ता.९) रात्री त्याचा मृत्यू झाला. अनिल आणि उमेश यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल केला होता. मात्र आज त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.