वीटभट्टी बालकांची सहल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीटभट्टी बालकांची सहल
वीटभट्टी बालकांची सहल

वीटभट्टी बालकांची सहल

sakal_logo
By

02121
कोल्हापूर : जिल्ह्यातील वीटभट्टी मजुरांच्या बालकांनी न्यू पॅलेसला भेट दिली.

वीटभट्टी वरील बालकांनी अनुभवली सहल!
न्यू पॅलेस छत्रपती शाहू महाराज वस्तू संग्रहालयाला दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जिल्ह्यातील वाकरे, खुपिरे, दोनवडे, सरनोबतवाडी, उचगाव व जाधववाडी येथील वीटभट्टीवरील डे-केअर सेंटर व ७ ते १४ वयोगटातील ६७ बालकांनी न्यू पॅलेसला भेट दिली. या वेळी प्रामुख्याने बालकांना राजर्षी शाही कुटुंबातील वेशभूषा, दागिने, छत्रपती शाहू महाराज यांनी शिकारीच्या वेळी वापरलेल्या बंदुका, भाले, कपडे, छत्रपती शाहू महाराज काळातील नाणी, नक्षीदार सोफे, छत्रपती शाहू महाराज केलेली शिकार यामध्ये वाघ, जंगली कुत्रा, जंगली म्हैस, सिंह व हरिण मुलांनी पाहिले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे संयोजन अमर कांबळे, रवी कुराडे, साताप्पा मोहिते व वीटभट्टीवरील शिक्षिका यांनी केले.