नूलमध्ये विकासकामांचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूलमध्ये विकासकामांचा प्रारंभ
नूलमध्ये विकासकामांचा प्रारंभ

नूलमध्ये विकासकामांचा प्रारंभ

sakal_logo
By

GAD112.JPG
02141
नूल : विविध विकास कामांचा प्रारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, प्रियांका यादव, प्रविण शिंदे, रामगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
नूलमध्ये विकासकामांचा प्रारंभ
नूल : येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दीड कोटींच्या विविध विकासकामाचा प्रारंभ झाला. आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जलजीवन मिशन अंतर्गत ९५ लाखाची सुधारित पाणी पुरवठा योजना, नदी घाटापर्यंतचा ३० लाख खर्चाचा रस्ता, पाटील वसाहतीतील १५ लाखाचा अंतर्गत रस्ता, धनगर समाजासाठी सामाजिक सभागृह, विठ्ठल मंदिर ते मेन रोड रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ केला. जयसिंग चव्हाण, सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, रामगोंडा पाटील, पी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
भाजपा युवा मोर्चा संघटन बांधणीवर चर्चा
गडहिंग्लज : येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये संघटन बांधणीवर चर्चा केली. विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक संदीप नाथबुवा यांनी संघटनात्मक काम कसे करावे याची माहिती देवून भविष्यात कार्यकर्त्यानी चांगल्या पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. उपशहरप्रमुख अनिल गायकवाड अध्यक्षस्थानी होते. युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुनिल पाटील, शहराध्यक्ष संग्राम आसबे, सोशल मिडीया शक्ती केंद्र प्रमुख अमोल बिलावर, मनिष पटेल यांची भाषणे झाली. शक्ती केंद्रप्रमुख सुदर्शन चव्हाण यांनी स्वागत केले. अमोल बिलावर यांनी आभार मानले. गणेश हजारे, राज बिलावर, आर्यन सुतार, तेजस बालेशगोळ, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
न्यूरो शिबीरास प्रतिसाद
गडहिंग्लज : केएलई, भरारी सामाजिक संस्था, सारथी फाउंडेशन आणि डॉ. बी. एस. पाटील हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत मेंदू आणि मणक्याचे आरोग्य तपासणी शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी केली. पाठ, मान, डोकेदुखीसह अपस्मार, हात आणि पाय अशक्तपणा आणि इतर न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्यांनी त्रस्त रुग्णांची तपासणी करुन गरजूंना मोफत औषधे दिली. पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया आवश्यक रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. डॉ. बी. एस. पाटील यांचे भाषण झाले. न्यूरोसर्जन डॉ. अभिषेक पाटील, डॉ. विक्रम टी. पी. यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. गडहिंग्लज आयएमएचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.