सोमलिंग मंदिर रस्त्याला ५० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमलिंग मंदिर रस्त्याला ५० लाख
सोमलिंग मंदिर रस्त्याला ५० लाख

सोमलिंग मंदिर रस्त्याला ५० लाख

sakal_logo
By

सोमलिंग मंदिर रस्त्याला ५० लाख
दुंडगे-माद्याळ रोड; जिल्हा नियोजनकडून निधी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील देवस्थान श्री सोमलिंग मंदिराकडे जाणाऱ्‍या रस्त्यासाठी (दुंडगे-माद्याळ रस्ता) ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतून हा निधी मिळाला आहे. आमदार राजेश पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी या निधीसाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
कोणतीही निवडणूक असो या मंदिरात येवून राजकीय नेते नारळ ठेवून श्री सोमलिंगाचा आशिर्वाद घेतात. परंतु, मंदिरापर्यंत येणाऱ्‍या रस्त्याच्या दूरवस्थेकडे दुर्लक्ष होत होते. मध्यंतरी गावातील एका कार्यक्रमात खासदार मंडलिक, आमदार पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी लावण्याची घोषणा केली होती. परंतु त्यालाही उशीर होत होता. ग्रामपंचायतीकडूनही पाठपुरावा सुरु होता. ‘सकाळ’नेही याबाबतचे वृत्त देवून सर्वांचे लक्ष वेधले.
‘सोमलिंगाचा आशिर्वाद हवा, मग रस्ता कर की भावा’ या मथळ्याखालील ‘सकाळ’च्या बातमीमुळे नेते व बांधकाम विभाग जागे झाले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्याचे इस्टिमेट तयार करुन पाठवण्याची सूचना गडहिंग्लज जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली आहे. त्याची कार्यवाही पूर्ण केल्याचे स्थानिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी सांगितले. रस्त्याची निविदा प्रसिद्ध होवून वर्क ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रांरभ होणार असला तरी आता पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.