शरद कृषिच्या विद्यार्थ्यांचे यश

शरद कृषिच्या विद्यार्थ्यांचे यश

शरद कृषिच्या विद्यार्थ्यांचे यश
दानोळी, ता. ११ ः जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालय येथील उत्तीर्ण पाच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेमध्ये विविध पदांवर यश मिळवले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१-२२ मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले. प्रमोद पाटील (रँक- १९) , अनिल पाटील (रँक - ८८), शुभम लिगाडे (रँक - ९२), स्वप्निल बांदिगरे (रँक - ९६) व हिना शेख (रँक - १७०) यांची विविध पदांवर निवड झाली आहे. शरदच्या विद्यार्थ्यांची प्रत्येकवेळी पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी निवड होत असते. विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत बाजी मारली आहे. महाविद्यालयात कृषि अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेतली जाते. त्यासाठी ग्रंथालयात पुस्तके व अभ्यासिकेची सुविधी दिली आहे. तसेच प्राध्यापक वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे शरद कृषीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळते. त्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थी व महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल श्री शामराव पाटील (यड्रावकर) एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com