आय.सी.एल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आय.सी.एल.
आय.सी.एल.

आय.सी.एल.

sakal_logo
By

लोगो
आय.सी.एल. (आजच्या पानातून)
02238
कोल्हापूर ः ‘सेराफ्लक्स’च्या श्रीधर वडरला धावचित करताना युनिकेम लेबोरेटिजचा भाग्यवंत तुरवले.
02237
कोल्हापूर ः सेराफ्लक्स इंडिया प्रायव्हेटच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर रोमहर्षक विजय मिळविल्यावर जल्लोष करताना खेळाडू.


किर्लोस्कर, सेराफ्लक्स पुढील फेरीत 
---
सकाळ माध्यम समूह व एच. आर. फोरम आयोजित स्पर्धा; चौकार, षटकारांची आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘सकाळ माध्यम समूह’ व एच. आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे सुरू असलेल्या पहिल्या ‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चौकार, षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. दत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. सिनर्जी सेफ्टी शूज सहप्रायोजक, तर वेलेटा विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहेत. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे.   
स्पर्धेतील सामन्यासह निर्णयासाठी खेळवलेली सुपर ओव्हरही बरोबरीत झाली. स्पर्धेतील अन्य सामन्यात अवघ्या २७ चेंडूंत ८० धावांची तुफानी खेळीही पाहायला मिळाली. प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स व सेराफ्लक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.          


02243
किर्लोस्कर संघाच्या प्रशांत धनगर यांना सामनावीरचा चषक देताना अक्षय थिटे.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा तडाखा 
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स संघाने झंझावाती खेळीमुळे अवघ्या २.५ षटकांत नाबाद ४१ धावा काढत सुयश ग्रुप संघावर विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना सुयश ग्रुप संघाने सहा षटकांत पाच बाद ३८ धावा केल्या. यात विष्णू पाटील व कुंदन गांधी यांनी प्रत्येकी ११ धावांचे योगदान दिले. ‘किर्लोस्कर’च्या शंकर चौगुले यांनी दोन, तर रणजित पाटील व राहुल कांबळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना किर्लोस्कर संघाने आक्रमक सुरुवात केली. यात प्रशांत धनगर यांनी २८, सचिन शिरोळे यांनी नऊ धावा करीत २.५ षटकांत ४१ धावा करून सामन्यात विजय मिळविला. प्रशांत धनगर सामनावीर ठरले. 

********************
02241
युनिकेमच्या किशोर मगरला सामनावीरचा चषक देताना अभयसिंह देसाई.

युनिकेम- सेराफ्लक्स लढत
सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत
सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि.विरुद्ध युनिकेम लॅबोरेटरीज् यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. धावांचा पाठलाग करताना बरोबरीत राहिलेला सामना सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. युनिकेम संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत तीन बाद ४३ धावा केल्या. यात सागर चांदोले यांनी १७, तर किशोर मगर यांनी १६ धावा केल्या. ‘सेराफ्लक्स’कडून संदीप पाटील यांनी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळणाऱ्या सेराफ्लक्स संघाने निर्धारित सहा षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ४३ धावा केल्या. यात दत्ता फराकटे यांनी १५, रोहन जाधव यांनी १२ व संदीप पाटील यांनी १० धावांचे योगदान दिले. ‘युनिकेम’कडून किशोर मगर व अजिंक्य देसाई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बरोबरीत सुटलेला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ‘सेराफ्लक्स’ने सहा चेंडूंत दोन बाद ११ धावा केल्या. यात संदीप पाटील ६, केतन निगडे ५ यांनी धावांचे योगदान दिले. ‘युनिकेम’कडून अजिंक्य देसाई यांनी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना युनिकेमही दोन गड्यांच्या मोबदल्यात ११ धावाच करू शकली. यात भाग्यवंत तुरवाले यांनी सात व किशोर मगर यांनी चार धावांचे योगदान दिले. अफसर शेख यांनी एक बळी घेतला. अनिर्णित राहिलेल्या सामन्यात दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. किशोर मगर सामनावीर ठरले. 

*****************

02244
‘सेराप्लक्स’च्या संदीप पाटीलला सामनावीरचा चषक देताना संजय बेनके.

‘सेराफ्लक्स’चा विजय 
सुयश ग्रुप ऑफ कंपनीस विरुद्ध झालेल्या सामन्यात सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि. संघाने विजय मिळवत महत्त्वपूर्ण अंक पटकावले. प्रथम फलंदाजी करताना सुयश ग्रुपने पाच गडी गमावत ५६ धावा केल्या. यात अजित खोत यांनी २४, प्रमोद अतिगरे यांनी १६ धावा केल्या. ‘सेराफ्लक्स’कडून रोहन जाधव यांनी दोन, अफसार शेख यांनी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सेराफ्लक्स संघाने तीन गडी गमावत ५७ धावा करून विजय मिळविला. यात संदीप पाटील यांनी ३७ व दत्ताबाळ फराकटे यांनी १२ धावा केल्या. सुयशच्या तुषार बोलवे यांनी दोन बळी घेतले. संदीप पाटील सामनावीर ठरले.  

*********************         
02240
किर्लोस्करच्या अरविंद चव्हाणला सामनावीरचा चषक देताना राहुल पाटील.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा दुसरा विजय 
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स संघाने युनिकेम लॅबोरेटरीज संघावर २३ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या किर्लोस्कर संघाने सहा षटकांत चार बाद ७० धावा केल्या. यात अरविंद चव्हाण यांनी २३, अजय शिरोळे यांनी १७, तर प्रशांत धनगर यांनी १४ धावांचे योगदान दिले. युनिकेमच्या किशोर मगर व भाग्यवंत तुरवाले यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळणाऱ्या युनिकेम संघाला निर्धारित सहा षटकांत चार बाद ४७ धावाच करता आल्या. यात भाग्यवंत तुरवाले यांनी २६ धावांची खेळी केली. ‘किर्लोस्कर’च्या रणजित पाटील, शंकर चौगुले, मंगेश जगदाळे, विश्वजित कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अरविंद चव्हाण सामनावीर ठरले.    

*****************
2245
सुयश ग्रुपच्या युवराज खामकरला सामनावीरचा चषक देताना संग्राम पाटील.

सुयश ग्रुपची ‘युनिकेम’वर मात
युनिकेम लॅबोरेटरीजने सहा षटकांत सात बाद ५० धावांच्या दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सुयश ग्रुप संघाने ५.४ षटकांत चार गडी गमावत ५२ धावा केल्या आणि सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना युनिकेम संघाच्या रणजित पाटील यांनी २१, राजकिरण पाटील यांनी १६ धावांची खेळी केली. ‘सुयश’च्या युवराज खामकर यांनी तीन, नीलेश बोरगे यांनी दोन व प्रमोद अतिग्रे यांनी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सुयश संघाच्या प्रमोद अतिग्रे यांनी १६, नीलेश बोरगे यांनी १२ व विष्णू पाटील यांनी ११ धावा केल्या. ‘युनिकेम’च्या किशोर मगर, भाग्यवंत तुरवाले, सिद्धू चव्हाण व आकाश पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. युवराज खामकर सामनावीर ठरले. 

***************
02246
‘किर्लोस्कर’च्या प्रशांत धनगरने ‘सेराफ्लक्स’च्या विरोधात २७ चेंडूंत नाबाद ८० धावांची खेळी केली.
(बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

02242
‘किर्लोस्कर’च्या प्रशांत धनगरला सामनावीरचा चषक देताना संजीव तुंगतकर.

प्रशांत धनगर यांची तुफानी खेळी

प्रशांत धनगर यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स संघाने सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि. संघाविरुद्ध सहा षटकांत एक गडी गमावत ११० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सेराफ्लक्स संघ सहा षटकांत चार बाद ५५ धावाच करू शकला. सामन्यात ५५ धावांनी विजय मिळवत किर्लोस्कर संघ गुणतक्त्यात सर्वोच्च स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ‘किर्लोस्कर’च्या प्रशांत धनगर यांनी नऊ षटकार व चार चौकार लगावत २७ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. त्यांना अमर पाटील यांनी १८ धावा करीत साथ दिली. ‘सेराफ्लक्स’च्या संदीप पाटील यांनी एक बळी घेतला. धावांचा पाठलाग करणारा ‘सेराफ्लक्स’चा संघ गडगडला. संदीप पाटील १८, सुरेश कांबळे नाबाद १७ यांच्याव्यतिरिक्त कोणालाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही. ‘किर्लोस्कर’च्या विश्वजित कुलकर्णी यांनी दोन, तर रणजित पाटील यांनी एक बळी घेतला. प्रशांत धनगर सामनावीर ठरले.                                   

चौकट
धावा- ८०
चेंडू- २७
चौकार- ४
षटकार- ९

*********************

आजचे सामने 
सकाळी ८- रॉकेट इंजिनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. विरुद्ध साई सर्व्हिस प्रा. लि.
सकाळी ९- सप्रे विरुद्ध व्ही. पी. ग्रुप 
सकाळी १०- सप्रे विरुद्ध रॉकेट इंजिनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि.
सकाळी ११- व्ही. पी. ग्रुप विरुद्ध साई सर्व्हिस प्रा. लि. 
दुपारी ३- रॉकेट इंजिनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. विरुद्ध व्ही. पी. ग्रुप 
दुपारी ४- सप्रे विरुद्ध साई सर्व्हिस प्रा. लि.