आजरा ः गव्याच्या हल्त्यात शेतकरी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः गव्याच्या हल्त्यात शेतकरी जखमी
आजरा ः गव्याच्या हल्त्यात शेतकरी जखमी

आजरा ः गव्याच्या हल्त्यात शेतकरी जखमी

sakal_logo
By

ajr112.JPG.... गुंडू केसरकर ajr113.JPG.... हल्ला केलेला गवा

आजऱ्यात गव्याच्या हल्ल्यात
शेतकरी गंभीर जखमी

आजरा, ता. ११ ः चाफेगल्ली (ता. आजरा) येथील शेतकरी गुंडू भैरू केसरकर (वय ८०) यांच्यावर आज गव्याने हल्ला केला. यामध्ये केसरकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
केसरकर यांचे खानापूर हद्दीत कासर नावाचे शेत आहे. आज सकाळी ते शेताकडे गेले होते. या शेतामध्ये त्यांनी ऊस पीक घेतले आहे. उसात लपलेला गवा त्यांना दिसला नाही. केसरकर यांच्यावर गव्याने समोरून हल्ला केला. त्यांना जमिनीवर आपटले. त्यामुळे गव्याचे एक शिंग पोटात घुसले आहे, तर दुसरे शिंग त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात घुसल्याने हात जायबंदी झाला. त्याही परिस्थितीमध्ये ते प्रसंगावधान राखत जीव वाचवून ते जवळील जाधव वसाहतीत पळत गेले. तेथील नागरिकांना याची कल्पना आली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयाकडे हलवले. तेथे उपचार झाल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, वनपाल संजय नीळकंठ यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.

चौकट
‘तो’ गवा जखमी
तो गवा जखमी असून, दोन दिवसांपूर्वी तो कासारकांडगाव परिसरात पहावयास मिळाला. त्याच्या पायाला जखम झाली असल्याने तो लंगडत आहे. त्याला जंगलातील मूळ अधिवासात हुसकावण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते; पण त्यांना तो चकवा देत होता.