इचल टुडे

इचल टुडे

02213
पेठवडगाव ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात भारतीय लोक संस्कृती आणि मौखिक परंपरेचा विद्यमान वारसा या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना सतीश माने. शेजारी अन्य मान्यवर.

लोकसंस्कृतीचे जतन करणे ही
सर्वांची जबाबदारीः सतीश माने

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा

पेठवडगाव, ता. ११ ः लोकसंस्कृतीचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सतीश माने यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभाग, इतिहास विभागा व ‘आयसीएसआर’तर्फे भारतातील लोक संस्कृती आणि मौखिक परंपरेचा विद्यमान वारसा या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. यावेळी त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
उद्घाटक आणि बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘लोकसाहित्य हे सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे संचित आहे.’ विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख, डॉ. अवनीश पाटील यांचे विशेष व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘ इतिहासाचा अभ्यास करताना साधने आणि पुरावे महत्वाचे असतात. लोक संस्कृती आणि मौखिक परंपरेचे ऐतिहासिक अंगाने संशोधन झाल्यास विविध नवे पैलू उलगडतील.’
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘भारतीय लोकसंस्कृती’वर मार्गदर्शन केले. यावेळी संशोधन लेखांचे वाचन झाले. प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले अध्यस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष जी. बी. कांबळे, सचिव एस एस.पाटील, संचालिका प्रा. प्रमिला माने आदी उपस्थित होते. कार्याशाळा समन्वयक प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com