ऊस पिकावर लष्करी अळी

ऊस पिकावर लष्करी अळी

फोटो क्रमांक ः gad118.jpg
कानडेवाडी : ऊस पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यक नंदकिशोर दुनगहू शेतकरी दिलीप देसाई, रणजित देसाई यांच्या पिकाला भेट दिली.
-------------------------------------------
ऊस पिकावर लष्करी अळी
नेसरी भागातील चित्र ः शेतकरी चिंतेत, कृषी विभागाचे बांधावर मार्गदर्शन
दिनकर पाटील ः सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. ११ : नेसरीसह परिसरातील सरोळी, कानडेवाडी, कुमरी, सांबरे भागातील ऊस पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
ॉनेसरी परिसरात घटप्रभा नदी काठावरील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पन्न घेतले जाते. ऊस पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडळ कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक नंदकिशोर दुनगहू, सचिन नाईक, राजाराम आजगेकर बांधावर जाऊन त्याबरोबरच गावोगावी गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. शेतकऱ्यांनी अळीचा प्रादूर्भाव कसा ओळखावा, उसाची पाने मधल्या शिरेपर्यंत खाल्लेली आढळतात. ढगाळ वातावरणात अळी दिवसाही उसाचे पाने खाताना आढळतात दिवसा अळ्या जमिनीत किंवा उसाच्या पानाच्या बेचक्यात लपून राहतात व रात्रीच्या वेळी पाने खातात पानाच्या बेचक्यात तपकिरी विस्टा आढळते यावर उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. लवकरच ऊस पिकावरी लष्करी अळी आटोक्यात येईल याबाबत कृषी विभाग मोहीम राबविण्यात येत आहे.
-----------
एनपीव्ही विषाणूच्या ५०० एलई तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास किंवा १० टक्के सायपर मेथ्रीन एक मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्यास किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी केल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल.
-नंदकिशोर दुनगहू, कृषी सहाय्यक, कानडेवाडी, ता. गडहिंग्लज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com