खुनातील बेपत्ता आरोपीला अटक

खुनातील बेपत्ता आरोपीला अटक

02165

खून प्रकरणी बेपत्ता आरोपीला अटक
कोल्हापूर, ता. ११ ः कोटितीर्थ तलावाजवळ ५ सप्टेंबरला तंबाखू मागणीच्या कारणावरून डोक्यात लाकडी बांबू आणि दगड घालून खून करून बेपत्ता असलेल्या एकास मिरजेतून अटक करण्यात आली. रोहित अजय सूर्यगंध (वय २८, रा. पिंपळेश्‍वर गणपती मंदिर, यादवनगर) असे त्याचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. यापूर्वी यातील पहिल्या संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबरला महापालिकेचे झाडू कामगार सकाळी सहाच्या सुमारास शिवाजी उद्यमनगर येथे झाडू मारत होते. तेव्हा येथील हॉस्पिटललगत असलेल्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या पत्र्यालगत बेवारस मृतदेह पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्‍यांनी राजारामपुरी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर तपासात मृत व्यक्तीचे नाव शंकर आकाराम कांबळे (वय ४५, रा. माळापुडे, ता. शाहूवाडी, जि. कोल्‍हापूर) असल्याचे स्पष्ट झाले. याची फिर्याद प्रवीण वाघमारे यांनी दिली होती. त्यांचा तंबाखू मागणीवरून खून झाल्याची माहिती तपासात पुढे आली.
दरम्यान, पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी शुभम अशोक शेंडगे याला त्यानंतर काही दिवसांतच अटक केली होती. मात्र, त्याचा साथीदार सूर्यगंध हा तेव्हापासून बेपत्ता होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. काल (ता. १०) तो मिरज मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनित तनपुरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पथक पाठवून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com