आत्महत्या

आत्महत्या

लक्षतीर्थ वसाहतीत मेस्त्रीची आत्महत्या
कोल्हापूर ः लक्षतीर्थ वसाहत येथील मेस्त्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमीर जहॉंगिर सय्यद (वय ३३, रा. लक्षतीर्थ वसाहत) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सय्यद हे चांगले मेस्त्री होते. आज सकाळी उठल्यानंतर त्यांनी चहा-नाश्‍ताही घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी घरातील राहत्या खोलीत जावून गळफास घेतला. त्यानंतर यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. तेथे ते मृत झाल्याचे जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com