चौथ्या दिवशी ५८३ विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा

चौथ्या दिवशी ५८३ विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा

चौथ्या दिवशी दिली
५८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा

कोल्हापूर, ता. ११ ः शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा सोमवार (ता. ८) पासून सुरू झाल्या. त्याच्या चौथ्या दिवशी विविध सहा विषयांची ५८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ८५ जण गैरहजर राहिले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील केंद्रावर एमएसडब्ल्यू (रूरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), बी. एस्सी., एम. एस्सी इकॉनॉमिक्स इंटिग्रेटेड, एम. ए. एम. एस्सी. जिओग्रॉफी, एमबीए (रूरल मॅनेजमेंट), एम. जे., एमबीए एक्झिक्युटिव्ह अथवा डिस्टन्स मोड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. त्यासाठी एकूम ६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विविध सहा अभ्यासक्रमांचे निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले. त्यात बी. व्होक.नर्सिंग, आर्टस अँड स्केच, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी गुरूवारी झाली. त्यासाठी १९३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ६० जण गैरहजर राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com