चार वर्षांत २० महाविद्यालयांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षांत २० महाविद्यालयांची भर
चार वर्षांत २० महाविद्यालयांची भर

चार वर्षांत २० महाविद्यालयांची भर

sakal_logo
By

(डेटा रिसर्च)
...

चार वर्षांत २० नव्या महाविद्यालयांची भर

शिवाजी विद्यापीठ संलग्नित कॉलेज वाढली; विद्यार्थ्यांना मिळाली त्यांच्या परिसरात शिक्षणाची सुविधा

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ ः दक्षिण महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षांत २० नव्या महाविद्यालयांची (कॉलेज) भर पडली आहे. त्यामुळे विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण कॉलेजची संख्या २८६ इतकी झाली आहे. त्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक विद्याशाखांच्या कॉलेजची संख्या १९५ आहे. विविध अभ्यासक्रमांच्या कॉलेजची संख्या वाढल्याने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
...........

बृहत आराखड्यास अनुसरून मंजूर महाविद्यालये

वर्ष* महाविद्यालयांची तरतूद केलेली संख्या* मंजूर झालेली संख्या
२०१९-२०*५०*०५
२०२०-२१*०६*०३
२०२१-२२*७६*०३
२०२२-२३*८८*०९
...................

विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांची संख्या
महाविद्यालय प्रकार* संख्या
कला, वाणिज्य व विज्ञान*१९५
विधी*०९
अभियांत्रिकी*२५
शिक्षणशास्त्र*३६
शारिरीक शिक्षणशास्त्र*०४
औषधनिर्माणशास्त्र*१६
मान्यताप्राप्त संस्था*०१
एकूण*२८६
.......................

अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये

एकूण अनुदानित महाविद्यालये*१३८
पारंपरिक*१२३
व्यावसायिक*१५
एकूण विनाअनुदानित महाविद्यालये* १४८
पारंपरिक*७१
व्यावसायिक*७७
........

जिल्हानिहाय महाविद्यालयांची संख्या
अभ्यासक्रमनिहाय* कोल्हापूर* सांगली* सातारा*
कला, वाणिज्य व विज्ञान*८३*५८*५४*
विधी*३*४*२
अभियांत्रिकी*१५*५*५*
शिक्षणशास्त्र*१७*१२*७
शारिरीक शिक्षणशास्त्र*३*१*०
औषधनिर्माणशास्त्र*७*५*४
मान्यताप्राप्त संस्था*१*०*०
एकूण*१२९*८५*७२
................

बृहत आराखड्यात आणखी
१९ महाविद्यालयांची तरतूद

सध्या विद्यापीठाच्या सन २०२४-२५ ते २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याचे काम सुरू आहे. त्यात नवीन महाविद्यालयांसाठी नियोजन समितीकडे ऑफलाईन स्वरूपात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून एकूण १९९ प्रस्ताव, तर ऑनलाईन गुगल फार्म प्राप्त संख्या ५१५० इतकी आहे. त्यातून एकूण १९ महाविद्यालयांची तरतूद करून मान्यतेचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.
........
कोट

‘शासन निर्णयानुसार आणि स्थानिक विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात महाविद्यालयांची सुरूवात आणि नव्या महाविद्यालयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी महाविद्यालयांनी करावी. बहुविद्याशाखीय शिक्षण, अभ्यासक्रम त्यांनी सुरू करावेत.
-व्ही. एस. सोयम, उपकुलसचिव, संलग्नता विभाग