खेळण्यांच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ

खेळण्यांच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ

jsp121-
02275
जयसिंगपूरः दरवाढीचा खेळणी व्यवसायाला फटका बसत आहे.

खेळण्यांच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ
केंद्र सरकारने आयात खेळण्यांवर कर लावल्याचा परीणाम; पालकांना फटका

जयसिंगपूर, ता. १२ः चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांवर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कर लावल्याने खेळण्यांच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन उन्हाळी सुटीत पालकांना खेळण्यांवरील दरवाढीचा फटका बसत आहे. दुकानदारांसह फेरीवाल्यांवरही दरवाढीचा परीणाम झाला आहे. विविध प्रकारची आणि विविध वयोगटातील खेळणी चीनमधून मोठ्या प्रमाणात येतात. केंद्र सरकारने कर वाढविल्याने याचा थेट परीणाम विक्रीवर झाला आहे.
चीनमध्ये खेळण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. अनेक वर्षापासून चीनमधूनच खेळण्यांची आवक होत असताना यातून कोट्यवधींची उलाढाल होते. लॉकडाऊननंतर चीनमधून सुटे भाग आणून भारतातच खेळण्यांची निर्मिती केली जात आहे. चीनमधून सुटे भाग आयात करण्याचे प्रमाण कमी करुन भारतातच सुटे भाग तयार करण्याची गरज आहे. तरच खेळण्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील. शिवाय अलिकडील काळात खेळण्यांच्या दर्जाबाबत ग्राहक समाधानी नसल्याची बाबही प्रकर्षाने लक्षात आली आहे. फेरीवाले आणि दुकानांमधील खेळण्यांमध्ये मोठा फरक जाणवतो.
बॅट-बॉल, बाहुल्या, घोडा, कॅरम, चेस, घरगुती वस्तू, रिमोट कंट्रोलच्या मोटारी, आगगाड्यापासून इलेक्टॉनिक वस्तूपर्यंत गाडी, मोटारपर्यंतच्या खेळण्यांच्या दरात वाढ झाली आहे. खेळणी आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेना झाली आहेत. बाहुली, टेडी, तलवार, रिंग, प्लास्टिक बॉल, बॅट, रिमोटवरील गाड्या, भांडी, ब्लॉक, म्युझिक लॅपटॉप या वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दरवाढीमुळे या खेळण्यांच्या मागणीतही काही प्रमाणात घट झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांचे दरात तिपटीने वाढ झाल्याने पालकांनी याकडे पाठ फिरविली आहे.
....

देशांतर्गत उत्पादने वाढीची गरज
चीनमधून मोठ्या प्रमाणात खेळण्यांची आवक होत असताना भारतात गेल्या काही वर्षात चीनमधून सुटे भाग आणून खेळणी बनविण्याचे प्रमाण वाढत आहे हि जमेची बाजू आहे. हे प्रमाण वाढले तर खेळण्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. शासनाने देशांतर्गत खेळणी उद्योगाला चालना देण्याची गरज आहे.
....

मोबाईमुळे मागणीत कमालीची घट
एका बाजूला मोबाईल बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असताना खेळण्यांच्या बाजारावर याचा परिणाम जाणवत आहे. खेळण्यांची दरवाढ आणि घटती मागणी यामुळे खेळणी व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
....

लघु उद्योगांना चालना देणे मेक इन इंडिया योजना सुरु करण्यात आली. चीनमधून येणाऱ्या खेळण्यांवर पर्याय म्हणून भारतात खेळणी उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. खेळण्यांचे भाव नियंत्रीत राखण्यासाठी हे गरजेचे आहे.

-विशाल उपाध्ये, खेळणी विक्रेते
....

महागाई वाढत असताना खेळण्यांच्या किंमती आवाक्या बाहेर आहेत. सुटीत मुलांना खेळणी खरेदी करणे खिशाला परवडणारे नाही. खेळण्यांच्या किंमती पाहून खरेदी करणे कठीण बनत आहे.

-विश्वास काळे, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com