आईस्क्रिमसाठी सर्व काही...!

आईस्क्रिमसाठी सर्व काही...!

बिग स्टोरी
अमोल सावंत

02391; 02398

घराघरांत
आईस्क्रिमचा थंडावा...

बाजारात सर्व साहित्य उपलब्ध; कमी भांडवलावर लघुउद्योग शक्य

लिड
पूर्वी गल्लीत एका बाजूला पांढरे खडेमीठ असलेल्या पेटीत बर्फाचे खडे टाकून छोटी तीनचाकी फिरत असे. या आईस्क्रिमच्या तीनचाकीत लालभडक गारेगार विकले जात असे. कालौघात तीनचाकी हळूहळू लुप्त होत गेली. आईस्क्रिमची छोटी-मोठी दुकाने उभी राहिली. आता तर आईस्क्रिम पार्लर संकल्पना उदयास आली. आईस्क्रिम पार्लर अन्‌ हाय-एंड आईस्क्रीम पार्लरने आईस्क्रिम खाण्याची ‘कन्सेप्ट’च समूळ बदलून टाकली. अगदी घरातही आईस्क्रिम तयार होऊ लागले. सोशल साईटस्‌वर तर आईस्क्रिम कसे तयार करायचे, याचे व्हीडीओ अपलोड होऊ लागले. आईस्क्रिम करणे सोप्पे झाले. दुसरे म्हणजे, ‘आईस्क्रिमसाठी लागणारं सर्व काही’ ही संकल्पना असलेली इसेन्स शॉप्स्‌ कोल्हापुरात तयार झाली. जिभेला चव देणाऱ्या आईस्क्रिमबद्दल सर्वकाही...!
- अमोल सावंत
...

ैआईस्क्रिमसाठी सर्व काही...!
ैही नवसंकल्पना आहे. अशा आईस्क्रिम शॉपीज् कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत. या शॉपीज्‌मध्ये काचेचे ग्लास/स्टायलिश वाट्या, चमचे, स्कूप्स, दूध पावडर, कोकोआ पावडर, मलई, फ्रेश क्रीम, साखर, चॉकलेट, व्हेनिला, बटरस्कॉच फ्लेवर्स, रंग पावडर,
आंबा, स्ट्रॉबेरी, किवी, चेरी किंवा अन्य फळांचे पल्प, ड्रायफ्रुट्स, कॉर्नफ्लोवर, स्टॅबिलायझर, इसेन्स्‌, बटरस्कॉच नटस्‌, डार्क कंपाऊंड चॉकलेटस्‌, हेवी आईस्क्रिमसाठी लागणारे क्रशेस साहित्य मिळते. याकरिता क्रशेस, इसेन्सचे विभाग वेगळे असतात. घरीच आईस्क्रिम तयार करायचे असेल तर तुम्ही अशा शॉपीज्‌मध्ये जाऊन लागणारे साहित्य घेऊ शकता.


इसेन्सचे अवाढव्य मार्केट
आईस्क्रिम कोणतेही असू दे, त्यासाठी इसेन्स आवश्‍यक असतात. असे २० ते २५ प्रकारचे इसेन्स अशा शॉपीज् मध्ये मिळतात. इसेन्समध्ये व्हेनिला, चॉकलेट, पायनापल, पिस्ता, बटरस्कॉच असे काही इसेन्स लोकप्रिय आहेत. श्री. दुलाणी म्हणाले, ‘‘व्हेनीला अन्‌ स्ट्रॉबेरी इसेन्सला अधिक मागणी आहे. त्यातही व्हेनिलाने ६० टक्के तर अन्य इसेन्सनी ४० टक्के मार्केट काबीज केले आहे. याबरोबर मँगो पल्पचा वापरही सर्वाधिक आहे.’’ वर्षभर अशा इसेन्स अन्‌ पल्पची विक्री सुरू असते. लोकांमध्ये आईस्क्रिमचा ट्रेंड इतका रुजला आहे, की दुपारी अन्‌ रात्री जेवण झाले की, आईस्क्रिमचा एखादा स्कूप हवाच, अशी मागणी असते. यासाठी घरीच आईस्क्रिम तयार केले जाते.

रेडी आईस्क्रिम मिक्सर
आईस्क्रिम करणं खूप सोपं झालंय; कारण रेडी आईस्क्रिम मिक्सर आईस्क्रिम शॉपीजमध्ये मिळतात. पाणी गरम करायचे. मग हे मिक्सर टाकायचे. फ्रिजमध्ये ठेवून टाकायचे. काही तासात आईस्क्रिम तयार होते. या सर्व साहित्यांच्या उत्पादनात ८० टक्के गुजरात तर २० टक्के मुंबई अग्रेसर आहे. हे सर्व इसेन्स, हेवी आईस्क्रिकरिता लागणारे क्रशेस गुजरात, मुंबईवरुन मागविले जाते. आईस्क्रिम घरी करणं सोपं होण्याचं मूळ कारण म्हणजे, इसेन्स शॉपीज. पूर्वी अशा शॉपीज नव्हत्या. आता तर शॉपीजबरोबर इन्स्टाग्राम, सोशल प्लॅटफॉर्मवर आईस्क्रिमचे छोटे कोर्सेस उपलब्ध आहेत.
...

चौकट
आईस्क्रिम उद्योग
आईस्क्रिमचा लघुउद्योग होऊ शकतो. यासाठी लागणारी आईस्क्रिम मशिनरी ऑनलाईन उपलब्ध आहे. ती तुम्ही ऑर्डर देऊन मागवू शकता. अगदी परिसरातही अशी आईस्क्रिम तयार करुन ही उन्हाळ्यात अधिक होते. तरीही सर्व ऋतूंत आईस्क्रिमला प्राधान्य असते. कमी भांडवलावर हा उद्योग उभा राहतो. उत्पादन जरी झाले तरी, विविक्री करता येते. विविध शासकीय परवानगी काढली तर एखादा छोट्या लघुउद्योगात रूपांतर होईल. घरच्याघरी रोजगार उपलब्ध होईल. सर्वाधिक विक्री तरण व्यवस्थेसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. परवडणारी किंमत, चव, पॅकेजिंग, रंग आदी फॅक्टर महत्त्वाचे ठरतात.
...

कोट
आईस्क्रिम सर्व वयोगटांतील लोकांत लोकप्रिय असते; मात्र असे आईस्क्रिम घरीच तयार करण्याचा ट्रेंड सर्वत्र दिसतो. विशेषत: युवती, स्त्रियांमध्ये एकदा तरी आईस्क्रिम तयार करुन पाहू या म्हणून तयारी करायला सुरवात करतात. आईस्क्रिम कसे तयार करायचे? त्यासाठी लागणारे साहित्य कोठे मिळते, यापासून माहिती घेतली जाते. आता तर घरोघरी फ्रिज, फ्रिजर आहेत. आईस्क्रिम तयार करण्यासाठी लागणारी छोटी मशिनरी, इसेन्स, क्रशेस इन्स्टंट मिळतात. ते घेऊन मग घरीच आईस्क्रिम तयार केले जाते.
-गौरव दुलाणी, महाराष्ट्र इसेन्स मार्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com