Mon, Sept 25, 2023

परिचारिका दिन कार्यक्रम
परिचारिका दिन कार्यक्रम
Published on : 12 May 2023, 2:43 am
02258
‘सीपीआर’मध्ये परिचारिका
दिनानिमित्त विविध कार्यक्रम
कोल्हापूर, ता. १२ ः जागतिक परिचारिका दिनानिमित्त सीपीआर हॉस्पिटलमधील परिचर्या संवर्गातर्फे जागतिक परिचारिका सप्ताह साजरा होत आहे. सीपीआरच्या अधीसेविका अंजली देवरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाले. ज्यामधे परिचारिकांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. ११) झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. आधुनिक परीचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचेपूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवृत्त अधिसेविका सुधा पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, साई सर्व्हिसेसतर्फे परिचारिका दिनानिमित्त मारुती सुझुकीची अल्टो गाडीचे अनावरण सीपीआरच्या परिचारिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरही घेण्यात आले.