गड-दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-दारु जप्त
गड-दारु जप्त

गड-दारु जप्त

sakal_logo
By

02374

गडहिंग्लज : जप्त केलेली गोवा बनावटीची दारु व संशयित आरोपीसह उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी.
-----------

पावणेदोन लाखांची दारु जप्त

नागनवाडीत कारवाई : गोडाऊनमध्ये केला होता साठा

गडहिंग्लज, ता. १२ : नागनवाडी (ता. चंदगड) येथे पावणेदोन लाख रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या हा साठा केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. नामदेव भिमाण्णा सावंत (वय ५२, रा. नागनवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी गोवा बनावटीच्या दारुची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री व वाहतूक होऊ नये, यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून चंदगड तालुक्यात गस्त घातली जात होती. उपनिरीक्षक किरण पाटील यांना नागनवाडीत गोवा बनावटीच्या दारुचा साठा केल्याची माहिती मिळाली. नामदेव याने आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस गोडाऊनमध्ये दारुचा साठा केला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत वेगवेगळ्या ब्रँडचे ३७ बॉक्स जप्त केले. त्याची किंमत एक लाख ८० हजार ९६० रुपये होते.
निरीक्षक एम. एस. गरुड, उपनिरीक्षक किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात यांनी ही कारवाई केली. निरीक्षक एम. एस. गरुड अधिक तपास करीत आहेत.