शिवराज युनायटेड ‘डेव्हलपमेंट’ लिग

शिवराज युनायटेड ‘डेव्हलपमेंट’ लिग

शिवराज युनायटेड ‘डेव्हलपमेंट’ लिग
युवा फुटबॉलपटूंना व्यासपिठ; आज बोली; बुधवारपासून प्रारंभ, अर्ध्या लाखाची पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्यासंकुलातर्फे एकवीस, अठरा आणि पंधरा वर्षाखालील खेळाडूसांठी ‘डेव्हलपमेंट लिग’ होणार आहे. युवा आणि कुमार खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक संधी मिळण्यासाठी बुधवार (ता. १७) पासून स्पर्धा होत आहे. त्यासाठी उद्या (ता. १३) सायंकाळी बोलीतून संघ निवडले जातील. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ‘लिग कम नॉकआऊट’ पध्दतीने ही स्पर्धा १७ ते २३ मे अखेर होईल. रोख अर्ध्या लाखाची परितोषिके असून स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
युवा आणि कुमार खेळाडूंना संधी खुपच कमी आहेत. ही उणीव लक्षात घेऊन खेळाडू घडवण्यासाठी ही ‘डेव्हलमेंट’ लिग होत आहे. गडहिंग्लजसह ग्रामीण भागातून खेळाडू यासाठी निवडले आहेत. त्यांची शनिवारी सायंकाळी बोलीद्वारे सहा संघात विभागणी होईल. भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) संघाचे किट देण्यात येणार आहे.
सहा संघाची प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन गटात विभागणी करुन लिग सामने होतील. गुणानुक्रमे अव्वल दोन संघ सुपरलिगसाठी पात्र ठरतील. रोज सायंकाळी दोन सामने आहेत. मैदानाचा आकारही लहान आहे. मंगळवारी (ता. २३) सांयकाळी अंतिम सामना होईल. याचा फुटबॉलपटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. लिग समन्वयक ओमकार घुगरी, सागर पोवार आणि सहकारी नियोजन करीत आहेत.
-----------------
खेळाडूंना प्रशिक्षण
निवडलेल्या ८० खेळाडूंना दहा दिवसांपासून प्रशिक्षण सुरू आहे. माजी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोव्याचे कार्लोस गोम्स हे दोन सत्रात एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर या खेळाडूंचा सराव घेत आहेत. खेळाडूंचा दर्जा सुधारावा, नवे बारकावे शिकता यावेत यासाठी यंदा प्रशिक्षणाची पध्दत सुरु केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com