
आवश्यक- संक्षिप्त
02379
प्रा. चंद्रकुमार नलगे यांचा
जीवनगौरव पुरस्काराने गौरव
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना दोन जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ''विंदा करंदीकर जीवन गौरव'' पुरस्काराने त्यांचा २७ फेब्रुवारीला उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गौरव झाला. मुंबई येथील ''पीपल्स आर्टस् सेंटर'' या संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रा. नलगे यांची आजअखेर ९७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्य सेवेची नोंद जगातील तेरा ''हुज हू'' ग्रंथामध्ये घेण्यात आली आहे. तीन राज्यांतील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. वयाच्या नव्वदीतही त्यांचे अखंडपणे लेखन सुरू आहे.
...........