
भैरवनाथ शिक्षण संस्थेत परिचारीका दिन
ich123.jpg
02387
इचलकरंजी ः भैरवनाथ शिक्षण संस्थेत परिचारीका दिनानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
-----
भैरवनाथ शिक्षण संस्थेत परिचारीका दिन
इचलकरंजी, ता. १२ ः वैद्यकीय क्षेत्रात परिचारीका यांचे विशेष महत्व आहे. जीवनात अखंडपणे रुग्णांची सेवा करण्याचे काम त्यांच्या हातून होत असते. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. संस्थेच्यावतीने परिचारीका दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ते बोलत होते. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थाध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील, व्यवस्थापक अनिकेत कांबळे, नर्सिंग स्कूलचे प्रिन्सिपल सनी आवळे, डीएमएलटीच्या प्रिन्सिपल वैशाली पाटील आदी उपस्थीत होते. यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन साजिद सनदी यांनी केले. आभार किशोर निकम यांनी मानले.