
डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन
डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या
विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर, ता. १२ ः डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते झाले. उद्या (ता. १३)पर्यंत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चरल डिझाइन, बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन ग्राफिक्स, इंटिरियर डिझाइन, अर्बन डिझाइन, तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट आदी विषयांची चित्रे व मॉडेल्स मांडली आहेत. उद्घाटन सोहळ्याला सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. रवींद्र सावंत, प्रा. आय. एस. जाधव, प्रा. गौरी म्हेतर व प्रा. शैलेश कडोलकर, विद्यार्थी समन्वयक व्यंकटेश कल्याणकर, मृणाल ठाकूर, तेजस पाटील उपस्थित होते. उद्घाटनानंतर आर्किटेक्ट डॉ. सागर टी. एस. यांचे, तर सायंकाळी आर्किटेक्ट अनुज काळे यांचे व्याख्यान झाले.