`गोविंदराव`च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणारः आमदार आवाडे

`गोविंदराव`च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणारः आमदार आवाडे

ich124.jpg
02392
इचलकरंजी ः गोविंदराव हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते झाले.

`गोविंदराव`च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवास
सर्वतोपरी सहकार्य करणारः आमदार आवाडे

इचलकरंजी, ता. १२ ः गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही इचलकरंजी शहराची शैक्षणिक मातृसंस्था आहे. या प्रशालेतून अनेक दिग्गज व्यक्तिमत्व घडली आहेत. वस्त्रनगरी इचलकरंजीच्या विकासात गोविंदराव हायस्कूलचे योगदान मोलाचे असून या प्रशालेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले.
येथील ना. बा. एज्युकेशन सोसायटी संचलित, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. त्यानिमित वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या नियोजनासाठी व्यापक बैठक पार पडली. यावेळी आमदार आवाडे यांच्याहस्ते शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण केले.
आजी-माजी विद्यार्थी व आजी-माजी शिक्षक यांचा सहभाग- समन्वय व सहकार्यातून हा महोत्सव नक्कीच यशस्वी होईल, अशा विश्वास प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक उपाध्यक्ष उदय लोखंडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष कृष्णा बोहरा, विश्वस्त महेश बांदवलकर, अशोक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. अहमद मुजावर, श्यामसुंदर मर्दा, अशोक केसरकर, संजय होगाडे, शाहीर विजय जगताप, बी. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गजाननराव सुलतानपुरे, प्रकाश दत्तवाडे, प्रमोद महाजन, पुरुषोत्तम पाटील, पि.आय.कोरे, आप्पासाहेब चौगुले, अमचंद जोशी, राजेंद्र व्यास, हेमंत कवठे, सतीश कोष्टी, राजगोपाल मर्दा, राजू मर्दा, प्रकाश चौगुले, राधेश्याम शर्मा, ॲड. चुडमुंगे, राजेंद्र घोडके, एच. ए. पाटील, एस. ए. पाटील, एस.जे.पाटील, एस. एस. चिंचवाडे, विजय माने, आर.जी. झपाटे, एस. एच. कवठे, आर. एस. पाटील, एस. एस. तेली, आर. डी. पिष्टे, एन. एस. पाटील, प्रा. चंद्रशेखर शहा, विकास कांबळे उपस्थित होते. आभार श्रीकांत चंगेडिया यांनी मांनले. सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com