आजरा ः आजरा शेतकरी संघासाठी उद्या मतदान

आजरा ः आजरा शेतकरी संघासाठी उद्या मतदान

आजरा तालुका शेतकरी
संघासाठी आज मतदान

आजरा, ता. १२ ः आजरा तालुका शेतकरी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १९ जागांसाठी आज, शनिवारी (ता. १३) मतदान होणार आहे. ४२ उमेदवार निवडणूक मैदानात असून दुरंगी सामना रंगणार आहे. संघासाठी २४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहेत.
तालुका शेतकरी संघाची सन २०२३ ते २०२८ अशी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. संघासाठी आज मतदान होणार असून रविवारी (ता. १४) निकाल जाहीर होईल. सत्ताधारी श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी विरोधात विरोधी श्री. रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. अपक्ष चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. सेवा संस्था प्रतिनिधी गट व इतर संस्थासाठी व्यंकटराव हायस्कूल येथे मतदान केंद्र आहे. या निवडणुकीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com