रंकाळा पाहणी

रंकाळा पाहणी

रंकाळा पदपथाजवळील ढासळलेली
भिंत दुरुस्तीचे शहर अभियंत्यांचे आदेश

कोल्हापूर, ता. १२ ः रंकाळा पदपथ उद्यानातील व्यासपीठाजवळील ढासळलेल्या संरक्षक भिंतीचे काम महापालिका तातडीने करणार आहे. सध्या पाण्याची पातळी कमी झाल्याने तातडीने काम सुरू करण्याच्यादृष्टीने शहर अभियंत्यांनी आज पाहणी करून सूचना दिली आहे.
पदपथ उद्यानातील व्यासपीठाच्या पूर्वेला असणारी संरक्षक भिंत ठिकठिकाणी कमकुवत झाली आहे. व्यासपीठाजवळील काही भाग ढासळला आहे. या परिसरात उद्यान असल्याने सुटीच्या कालावधीत लहान मुलांची व नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे बॅरिकेड्‌स लावून पडलेल्या भागाजवळ जाण्यास मज्जाव केला होता. त्या भिंतीला पाच ते सहा ठिकाणी काँक्रीट निघाले आहे, दगड सुटत आहेत. त्याची आत्ताच दुरुस्ती करणे शक्य आहे. पावसाचे पाणी वाढल्यानंतर पुन्हा बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांनी आज पाहणी करून संरक्षक भिंतीची स्थिती समजून घेतली. तसेच अंदाजित खर्च काढण्याची सूचना देऊन काम लवकर सुरू करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासोबत त्यांनी रंकाळ्याजवळील एका इमारतीमधील महापालिकेला मिळालेल्या जागेत पार्किंगच्या नियोजनाबाबत पाहणी केली. यावेळी उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते.

चौकट
प्रशासकांकडूनही शहरात पाहणी
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह शहरात पाहणी केली. त्यांनी लाईन बाजार, विचारे माळ, कावळा नाका झोपडपट्टी, इंदिरानगर, राजारामपुरी येथे पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com