पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचा २५ मेपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचा २५ मेपासून प्रारंभ
पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचा २५ मेपासून प्रारंभ

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचा २५ मेपासून प्रारंभ

sakal_logo
By

विद्यापीठ ...लोगो
...

पदवी प्रथम वर्षाच्या
परीक्षांना २५ मेपासून प्रारंभ

महाविद्यालयांकडे जबाबदारी; पारंपरिक अभ्यासक्रमांचा समावेश

कोल्हापूर, ता. १२ ः शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदवीस्तरावरील परीक्षा (प्रथम आणि द्वितीय वर्ष-सत्र १,२, ३ आणि ४) महाविद्यालय पातळीवर २५ मे पासून होणार आहेत. त्यात बी. ए., बी. कॉम., बीसीए., आदी पारंपरिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्‍नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अशी सर्व परीक्षाविषयक कामाची जबाबदारी महाविद्यालयांवर आहे. दूरशिक्षण केंद्रांकडील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन ज्या-त्या महाविद्यालयातील प्राचार्य अथवा दूरशिक्षण केंद्राच्या समन्वयकांनी करायचे आहे. पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय आणि अधिविभागस्तरावर होणार आहेत. महाविद्यालयस्तरावरील परीक्षा १५ ते २५ जून, तर विद्यापीठातील अधिविभागांच्या पातळीवर १ ते १५ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात याव्यात, अशा सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी महाविद्यालय, अधिविभागांना शुक्रवारी केल्या आहेत.
............

महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची मुदत

अभ्यासक्रम* प्रथम वर्ष (सत्र १ आणि २)* द्वितीय वर्ष (सत्र ३ व ४)
बी. ए., बीबीए., बी. ए. (मल्टिमिडिया, डिफेन्स स्टडी, इतर बी. व्होक परीक्षा)* ता. २५ मे ते १० जून* ता. १ ते २० जून
बी. कॉम., बीसीए., बी. कॉम (बिझनेस मॅनेजमेंट, बँक मॅनेजमेंट व इतर)* ता.२५ मे ते १० जून* ता. १ ते २० जून
बी. एस्सी., बीसीए., बी. एस्सी. (बायोटेक, शुगरटेक, आयटी व इतर)* ता. १ ते २० जून* ता.७ ते २५ जून
.........................

१८९६ विद्यार्थ्यांनी दिली ‘एमएचटी-सीईटी’

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शुक्रवारी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा १८९६ विद्यार्थ्यांनी दिली, तर ४७ जण गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी एकूण १९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.