बचत गटांना फळ प्रक्रिया यंत्र

बचत गटांना फळ प्रक्रिया यंत्र

जिल्‍हा परिषद ... लोगो
....

बचत गटांना फळ प्रक्रिया यंत्र

समाजकल्याण समितीचा निर्णय

कोल्‍हापूर, ता.१२: मागासवर्गीय बचत गटांना त्यांचे अर्थाजन होण्यासाठी फळावर प्रक्रिया निर्माण करणारी यंत्रे, रेशीम उद्योग यासाठी चालना देणारी यंत्रसामग्री व इतर साहित्य देण्याचा निर्णय आज झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे उपस्‍थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत, मागासवर्गीय गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. त्याऐवजी त्या वस्‍त्यांना समता निर्माण करणारे उदात्त नाव देण्याचा ठराव एक आठवड्यात जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत मार्च अखेरपर्यंत अनेक गावांनी शंभर टक्के खर्च केलेला नाही. त्याबाबत श्री.चव्‍हाण यांनी नाराजी व्यक्त करत याबाबतचा अहवाल मागितला. मागासवर्गीय वसाहतीमध्ये शारीरिक व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी जीम साहित्य खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

मागासवर्गीय वसाहतीमध्ये असणाऱ्या कुस्ती खेळामध्ये आवड निर्माण होण्यासाठी तालीम बांधणे, मेडिकल व इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला. अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल देण्यावरही शिक्‍कामोर्तब करण्यात आले. यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी संजय खारगे, सुवर्णा नागरगोजे व पंचायत समिती कार्यालयातील समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com