
शाहू मिल
लोगो
...
विविध प्रांतातील कलाकारांचे
आजपासून राजर्षी शाहूंना अभिवादन
शाहू मिलमध्ये कार्यक्रमः आंबा महोत्सवासह प्रदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, ता. १२ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृति शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत उद्या (शनिवार) पासून विविध प्रांतातील कलाकार लोककलेच्या माध्यमातून राजर्षी शाहूंना अभिवादन करणार आहेत. सलग दोन दिवस छत्रपती शाहू मिलमध्ये सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हा आविष्कार सजणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल.
महोत्सवांतर्गत उद्या (शनिवारी) सकाळी दहा ते बारा या वेळेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेब पाटील यांची ‘ॲनिमेशन-कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान'' या विषयावर कार्यशाळा होईल. रविवारी (ता.१४) नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांची नृत्य प्रकारांवर कार्यशाळा होणार असून या कार्यशाळा विनामूल्य आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
...
आंब्याच्या ५२ जाती
आंबा प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या विविध ५२ जाती पाहण्यासाठी व माहिती होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जहांगीर पसंत, गोवा मानकूर, हापूस, सुपर केशर, करण जिओ, मबाराम, तोतापुरी, वनराज, बनारसी हापूस, दूध पेढा, वेलाई कोलंबन, रुमानी, सब्जा, केशर, करेल, मुशराद, बाटली, बेंगलोर गोवा, मलीका, बदाई गोवा, बदामी, उस्टीन, लिली, सिंधू, आम्रपाली, माया, केंट, निलम, रायवळ, लंगडा, पायरी, टॉम ऑटकीन, बारमाही, जम्बो केशर आदी दुर्मिळ आंब्यांच्या जाती आहेत. केशर व हापूस आंबा रोपेही येथे उपलब्ध आहेत.