
डॉ.विनोद पवार यांची बदली
जिल्हा परिषद ... लोगो
...
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार यांची बदली
कोल्हापूर, ता.१३: जिल्हा परिषदेतील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार यांची सातारा जिल्हा परिषदेकडे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. प्रमोद बाबर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. पवार यांनी चार वर्षाच्या कालावधीत अनेक नाविण्यपूर्ण कामे केली. महत्वाचे म्हणजे कोल्हापुरात आलेला महापूर तसेच लम्पीची साथ यामध्ये उत्कृष्ट काम केले. पशुवैद्यकीय विभागाकडून त्यांनी विविध योजना जिल्ह्यात राबवल्या.
जिल्ह्यातील सर्वसाधारण वर्गातील लोकांसाठी एकही अनुदानाची योजना नसल्याने त्यांनी यासाठी प्रयत्न केले. दुधाळ जनावरांचा गट वाटप ही योजना लागू करण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच मराठवाडा पॅकेज या योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करावा, यासाठी ते प्रयत्नशील होते. ही योजना लागू झाली तर दरवर्षी १ हजार जनावरे घेण्यासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुधन व दुधाचे उत्पादनही वाढणार आहे. लम्पीच्या काळात तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जावून त्यांनी लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
...
डॉ. पठाण यांचीही बदली
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.याह्याखान पठाण यांचीही उपायुक्त पशुसंवर्धन, पुणे या ठिकाणी बदली झाली आहे. रोग अन्वेषण विभागाचा कार्यभार त्यांच्यावर देण्यात आला आहे. स्मार्ट योजनेतून पशुसंवर्धन व कुक्कुटपालन अंतर्गत विविध प्रकल्प सुरु करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.