शाहू मिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू मिल
शाहू मिल

शाहू मिल

sakal_logo
By

02617
...

ॲनिमेशनपटाच्या निर्मिती
प्रक्रियेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रमांची आज सांगता

कोल्हापूर, ता. १३ ः बालमित्रांच्या दुनियेतील नायक असलेल्या ''सिम्बा'' या ॲनिमेशनपटाची निर्मिती प्रक्रिया ते पडद्यावर अथवा टीव्हीवर प्रसारणापर्यंतची सारी माहिती आज उलगडली. निमित्त होते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या शिबिराचे. रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओजचे क्रिएटिव्ह प्रमुख भाऊसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ॲनिमेशन म्हणजे चलचित्र आहे. टूडी ऍनिमेशन (मूक) १९०८ मध्ये तर आवाजासह पहिले टूडी ऍनिमेशन १९२८ मध्ये सुरु झाले. कार्टून फिल्म निर्मितीत चित्रकलेचे महत्त्व मोलाचे आहे. शिक्षणाबरोबरच खेळाला व अंगी असलेल्या कलागुणांना आवर्जून वेळ द्या, असा सल्ला श्री. पाटील यांनी दिला. डिजिटल पेंट आर्टिस्ट शुभम बिरांजे यांनी सहकार्य केले. दळवीज आर्टसचे प्राचार्य अजय दळवी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळच्या सत्रात विविध राज्यातील लोककलाकारांच्या ‘नृत्यवंदना’ या कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
...
लोककलांचे आज सादरीकरण
नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांची उद्या (रविवारी) सकाळी साडेदहा ते साडेबारा यावेळेत विविध नृत्य प्रकारांवर आधारित विनामूल्य प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत विविध प्रांतातील कलाकारांच्या लोककलांचा कार्यक्रम होणार आहे.