पत्रके बातम्या पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके बातम्या पत्रके
पत्रके बातम्या पत्रके

पत्रके बातम्या पत्रके

sakal_logo
By

‘तुम्ही व तुमचे केस’
विषयावर व्याख्यान
कोल्हापूर : औरंगाबाद येथील प्रसिध्द आयुर्वेदाचार्या डॉ. रोहिणी काचोळे यांचे ‘तुम्ही व तुमचे केस’ या विषयावर मोफत व्याख्यान होणार आहे. स्वास्थ्यार्थम् आयुर्वेद आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे याचे आयोजन केले असून शनिवारी (ता. २०) राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल. केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोंडा होणे, चाई लागणे, अकाली टक्कल पडणे आदींवर डॉ. काचोळे मार्गदर्शन करणार आहेत. ब्युटी पार्लर्स, केस व सौंदर्य उपचार क्षेत्रात काम करणाऱ्यांसह इच्छुकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रणव पाटील, डॉ. यशपाल हुलस्वार यांनी केले आहे.
------------
शाहू कॉलेजतर्फे कर्मवीर अण्णांना अभिवादन
कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजतर्फे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महाविद्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या कर्मवीरांच्या पुतळ्यास उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या पुतळ्यास डॉ. किल्लेदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, विजय मगदूम, उपप्राचार्या डॉ. एस. जे. आवळे, कार्यालयीन अधीक्षक बी. एम. शिंदे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, महापालिकेचे कामगार, अधिकारी उपस्थित होते.
--------------
डॉ. आंबेडकर भवनसाठी निवेदन
कोल्हापूर : पांडवदरा मसाई पठारावरील प्राचीन बौध्द लेणी, पन्हाळा-कुशीरे पोहाळे बौध्द लेणीचे संवर्धन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी जिल्हा आराखड्यात मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासकांना जिल्हा बौध्द अवशेष आणि डॉ. आंबेडकर सामाजिक अन्याय कृती समितीतर्फे निवेदन दिले. शहरात डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख ते चार कोटी रूपयांची मागणी केली आहे. प्रशासनाने कामाची मजुरी दिली; परंतु पुढील कार्यवाही अद्याप झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. याकरीता जिल्हा बौध्द अवशेष, डॉ. आंबेडकर सामाजिक अन्याय कृती समितीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. शिष्टमंडळात कृति समितीची अध्यक्ष टी. एस. कांबळे, बापूसाहेब कांबळे, अनिल कांबळे, चंद्रकांत जावळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
-------------------
02661
संदीप कुंभार यांची निवड
कोल्हापूर : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि निमंत्रित सदस्य म्हणून संदीप कुंभार यांची निवड झाली. कुंभार यांनी यापूर्वी ओ. बी. सी. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली. निवडीसाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील, विजय चौधरी, योगेश आण्णा टिळेकर, खासदार धनंजय महाडिक, राहूल चिकोडे, महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------

02669
डी. ए. चौगुले यांची निवड
कोल्हापूर : डी. ए. चौगुले यांची सीए इन्स्टिट्युटच्या सहकारी संस्था समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली. याबाबतचे पत्र सीए इन्स्टिट्युट पश्चिम भारतीय प्रादेशिक मंडळाचे अध्यक्ष अर्पित काब्रा यांच्याकडून दिले. चौगुले यांनी सहकार खात्यात विभागीय सहनिबंधक लेखापरिक्षण पुणे आणि कोल्हापूर विभाग पदावर काम पाहिले आहे.