Mon, Sept 25, 2023

गड-विवाहितेची आत्महत्या
गड-विवाहितेची आत्महत्या
Published on : 13 May 2023, 1:49 am
02649
...
गडहिंग्लजला विवाहितेची आत्महत्या
गडहिंग्लज, ता. १३ : येथील विवाहितेने भडगाव पुलाजवळ हिरण्यकेशी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अश्विनी राहुल मुसळे (वय ३२, रा. हरळी बुद्रुक, ता. गडहिंग्लज, सध्या रा. आर्या अपार्टमेंट, भडगाव रोड, गडहिंग्लज) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे ही घटना घडली. अश्विनी यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांच्यावर मागील चार वर्षांपासून उपचार सुरु होते. दरम्यान, आज पहाटे चारच्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या. त्यांनी गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पुलाजवळ हिरण्यकेशी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. नागरिकांना सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. राहुल मुसळे यांनी याबाबतची वर्दी दिली आहे. हवालदार रवी जाधव अधिक तपास करीत आहेत.