
संभाजी महाराज जयंती
04876
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बिंदू चौकात उभारलेला भव्य पुतळा.
02461
कोल्हापूर : दसरा चौकात संभाजी ब्रिगेड व मुस्लिम बोर्डिंगतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकृतीच्या अनावरणप्रसंगी मालोजीराजे छत्रपती, गणी आजरेकर, चारुशीला पाटील, अश्विन वागळे, अभिषेक मिठारी आदी. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)
छत्रपती शंभूराजेंची जयंती विविध उपक्रमांनी होणार साजरी
भव्य मिरवणुकींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या (ता.१४) भव्य मिरवणुकांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शंभूराजांच्या शौर्याबरोबरच त्यांच्या विचारांचा जागरही यानिमित्ताने होणार आहे.
दरम्यान, शहरात सर्वत्र शंभूराजांच्या चरित्रातील विविध प्रसंगावर आधारित फलक उभारले असून, शहर आणि परिसर शंभूमय झाला आहे.
बिंदू चौकात धर्मवीर १४ मित्र मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराजांची २१ फुटी मूर्ती स्थापन केली आहे. सायंकाळी येथे पोवाड्याचा कार्यक्रम झाला.
-----------------
०४८८५
कोल्हापूर : संयुक्त शाहूपुरी उत्सव समितीतर्फे शनिवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील देखाव्याचे उद्घाटन झाले. या वेळी बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. व्यासपीठावर अनिल पाटील, डॉ. सतीश पत्की, ऋतुराज क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, राहुल चिक्कोडे, कृष्णराज महाडिक यांच्यासह समितीचे पदाधिकारी.
‘संयुक्त शाहूपुरी’च्या देखाव्याचे उद्घाटन
शालेय वयातच छत्रपती शंभूराजेंचा इतिहास मुलांना माहिती व्हायला हवा. शंभूराजेंनी कर्तव्य आणि विचारांची कधीही प्रतारणा केली नाही. सर्वांना एकत्र घेऊनच त्यांनी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान दिले, असे स्पष्ट मत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केले. संयुक्त शाहूपुरी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित देखाव्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
खासदार संजय मंडलिक, युवा सेनेचे अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, मालोजीराजे छत्रपती, डॉ. सतीश पत्की, अनिल पाटील, कृष्णराज महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी यावेळी उपस्थित होते. छत्रपती शंभूराजेंच्या जीवनावरील सजीव देखावा यावेळी सादर झाला. ‘नृत्यनिकेतन’च्या वतीने भरतनाट्यमचे सादरीकरण झाले. दरम्यान, उद्या (ता. १४) सकाळी दहा वाजता परिसरातील महिलांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा होणार असून, सायंकाळी चारला भव्य मिरवणूक होईल.
----------------
12804
कोल्हापूर : पापाची तिकटी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाची पाहणी करताना शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपअभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, आर्किटेक्ट रणजित निकम आदी.
संभाजी महाराज शिल्पाचे
काम अंतिम टप्प्यात
कोल्हापूर, ता. १३ : महानगरपालिकेतर्फे पापाची तिकटी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिल्पकार किशोर पुरेकर त्याचे काम करत आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी म्युरल्सची आज पाहणी केली. या वेळी शहर उपअभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, आर्किटेक्ट रणजित निकम, पंडित पोवार, अश्किन आजरेकर, श्रीराम जाधव, अभिजित सूर्यवंशी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांचे म्युरल्स परीक्षणाकरिता स्मारक समिती स्थापन करण्यात येणार असून, इतिहास अभ्यासक, तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे.