भाजप शहराध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांशी संवाद

भाजप शहराध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांशी संवाद

02708
...

भाजप शहराध्यक्ष नियुक्तीसाठी
कार्यकर्त्यांशी संवाद

माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत मुलाखती

कोल्हापूर, ता. १३ ः भारतीय जनता पक्षाच्या महानगर आणि ग्रामीण अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज पक्ष निरीक्षक माजी खासदार अमर साबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, मंडल प्रमुख, माजी नगरसेवक यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर उपस्थित होते. शहर अध्यक्ष कोण असावा, यासाठी साबळे यांनी प्रत्येकाचे व्यक्तिगत मत जाणून घेतले. शासकीय विश्रामगृहामध्ये या मुलाखती पार पडल्या.
भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण आणि महानगर जिल्हाध्यक्षांची मुदत संपल्याने नव्याने अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रक्रियेप्रमाणे निरीक्षक म्हणून माजी खासदार अमर साबळे येथे निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी प्रत्येकाशी बंद खोलीत व्यक्तिगत संवाद साधला. यामध्ये संघटनेच्या कामातील अडचणी, इच्छुक उमेदवारांबद्दलचे मत आणि त्यांना वाटणाऱ्या अध्यक्षाचे नाव जाणून घेण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर यांच्याशी देखील व्यक्तिगतपणे साबळे यांनी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक नाना कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, माजी महापौर दिपक जाधव, आशिष ढवळे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
-----------
१५ मे पर्यंत निवड शक्य

कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर याचा अहवाल प्रदेश भाजपला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन अंतिम निवड करण्यात येईल. विजय जाधव, विजय सूर्यवंशी आणि अजित ठाणेकर यांची नावे शहराध्यक्षासाठी चर्चेत आहेत. तर ग्रामीण भागासाठी दोन अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. महानगर आणि ग्रामीण अशा सर्वच अध्यक्षांची नावे १५ मे पर्यंत जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com