श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवस साजरा

श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवस साजरा

02691
कोल्हापूर : श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवसानिमित्त आयर्विन ख्रिश्‍चन मल्टिपर्पज हॉलमध्ये आयुष होम करण्यात आला. या वेळी साधक उपस्थित होते.


श्री श्री रविशंकर यांचा
वाढदिवस विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : दि आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा ६७ व्या वाढदिवस विविध उपक्रमांनी झाला. यानिमित्त आयर्विन ख्रिश्‍चन मल्टिपर्पज हॉलमध्ये सायंकाळी आयुष होमचे आयोजन केले. तत्पूर्वी, श्री गणेश वंदना झाली. यानंतर लहान मुलांनी नृत्य सादर केले. महाप्रसादाचे वाटप झाले.
सकाळी सर्व साधकांसाठी सुदर्शन क्रियेचे आयोजन केले. गुरुदेवांबरोबर लॉस एंजिलिस (अमेरिका) येथून लाईव्ह मेडिटेशन कार्यक्रम झाला. जगभरातील १८० पेक्षा अधिक देशांत लाईव्ह मेडिटेशन प्रसारीत झाले. जगभरातील साधकांशी गुरुदेवांनी संवाद साधला. दिवसभर साधकांनी विविध माध्यमातून सेवा केली. यामध्ये आप्पा लाड, श्रद्धा लाड यांनी सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमधील गर्भवती महिलांसाठी पोषक आहार दिला. पुलाची शिरोली येथे वृक्षारोप कार्यक्रम घेतला. इचलकरंजी, वारणानगर, वडगाव येथे रक्तदान शिबीर झाले. रक्तदान शिबीरात अनेकांनी सहभाग घेतला. सचिन मुधाळे, डॉ. अनिमा दहिभाते, डिम्पल गजवाणी, पद्मनाभ देशपांडे, दिव्या चंदवाणी, डॉ. राजश्री पाटील, राहूल नागवेकर आदींनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com