
सुरज हनिमनाळे ठरला हिरो
gad144.jpg
02780
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेन्ट फुटबॉल लिगच्या किटचे अनावरण अनिल कुराडे यांनी केले. जगदिश पट्टणशेट्टी, सतीश माळी, मल्लिकार्जून बेल्लद,गुंडू पाटील, अलीखान पठाण, गौस मकानदार आदी उपस्थित होते.
------------------------------
सुरज हनिमनाळे ठरला हिरो
शिवराज युनायटेड लिग : श्रवण पाटीलला मागणी; अडीच तास रंगली ७२ खेळाडूंसाठी बोली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : सलग दुसऱ्यावर्षी सुरज हनिमनाळे ( १८०० गुण) सर्वाधिक गुण घेत हिरो ठरला. शिवराज युनायटेड ''डेव्हलपमेन्ट'' लिग स्पर्धेचा खेळाडूंच्या बोलीचा कार्यक्रम उत्कंठावर्धक वातावरणात अडीच तास रंगला. पाठोपाठ श्रवण पाटील (१२००), साकिब मणेर, प्रसाद पवार (१०००), सिध्दार्थ दड्डीकर (९००) यांनाही लक्ष वेधले. एकूण सहा संघासाठी ७२ फुटबॉलपटूंवर एम. आर. हायस्कुलच्या सभागृहात ही बोली लागली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे मंगळवारपासून लिग होणार आहे.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याहस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी स्पर्धेची माहिती दिली. आयएसएल सहा संघांचे किटचे अनावरण युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, गुंडू पाटील, जगदिश पट्टणशेट्टी, सतीश माळी, अलीखान पठाण, गौस मकानदार, अरुण पाटील यांच्याहस्ते झाले. प्रशिक्षक म्हणून यासीन नदाफ, ओमकार सुतार, सुल्तान शेख, सागर पोवार, ओमकार घुगरी,अनिकेत कोले यांची ड्रॉ मधून निवड झाली. श्री कुराडे यांचे भाषण झाले.
सुरज हनिमनाळेने सर्वाधिक गुण मिळवून बाजी मारली. चांगले खेळाडू घेण्यासाठी संघमालकात चढाओढ रंगली होती. खेळाडूतही व्यासपिठावर गेल्यावर बोली किती लागणार याची उत्सुकता दिसली. विशाल चौगुले, शुभम कागिणकर आयकॉन खेळाडू म्हणून निवडले गेले. यावेळी सुनिल साठे, बाळासाहेब दळवी, प्रशांत दड्डीकर यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. हुल्लापा सुर्यवंशी यांनी आभार मानले.
--------------
महाविद्यालयीन संघ बळकट
गडहिंग्लजला फुटबॉलची मोठी पंरपंरा आहे. अलिकडे खेळाडूही वाढले आहेत. पण, महाविद्यालयीन स्तरावर बळकट संघ नसल्याने केंद्राची पिछेहाट आहे. त्यासाठी युनायटेडने पुढाकार घेऊन संघ बनवावा. त्यासाठी शिवराजच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत देण्याची ग्वाही श्री कुराडे यांनी देताच खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात याचे स्वागत केले.