
पार्श्वनाथ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
ich141.jpg
02783
इचलकरंजी : शिक्षक पार्श्वनाथ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आयुक्त देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पार्श्वनाथ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे सहायक शिक्षक पार्श्वनाथ आप्पासो पाटील यांना महानगरपालिकेचा २०२२-२३ चा आदर्श शिक्षक पुरस्कार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते प्रदान केला. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, प्रशासनाधिकारी नम्रता गुरसाळे, नगरसचिव विजय राजापूरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे, महानगरपालिकेचे क्रीडाअधिकारी तथा मुख्याध्यापक शंकर पोवार उपस्थित होते.
-------------------
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे यश
इचलकरंजी : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने यश मिळवले. शाळेचा निकाल 100 टक्के लागला. स्कूलमध्ये चिराग बलदवा - ९६.२० टक्के, आर्या आमणे - ९५.६० टक्के, सुप्रियाराज मेहता - ९४.२० टक्के गुण प्राप्त केले. ११ विद्यार्थिनी ९० ते ९३.४० टक्के गुण मिळावले. विद्यार्थ्यांना प्रा. ईश्वर पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
---------------------
डीकेटीईचा १०० टक्के निकाल
इचलकरंजी : डीकेटीई सोसायटी इंटरनॅशनल स्कूल तारदाळ दहावीचा शंभर टक्के निकाल लागला. यामध्ये शंतला पाटील ९८.६० टक्के, प्रथम, पूर्वा कदम ९२.८० टक्के द्वितीय, स्नेहा खोत ८९.४० टक्के, तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माला सुद, उपमुख्याध्यापक संदीप नेजकर यांचे मार्गदर्शन लाभले.