
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
सफाई कर्मचाऱ्यांची आज बैठक
गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष मुकेश सारवान पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (ता. १५) गडहिंग्लजला येणार आहेत. नगरपरिषदेत सकाळी अकराला ते बैठक घेणार आहेत. सफाई कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने वेळोवेळी केलेल्या शासना निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा ते घेणार आहेत. सफाई कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या शहराध्यक्षा शारदा सातपुते यांनी केले आहे.
-------------------
ओंकारच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला अभ्यास भेट दिली. गृहशास्त्र विभागातील व्दितीय वर्षांचे विद्यार्थी यात सहभागी झालो होते. रुग्णालयाच्या मॅटर्निटी होममधील गर्भवती स्त्रियांचा आहार, लसीकरण, स्वच्छता, इतर आजारांचे प्रमाण आदींची माहिती घेतली. तारांगण खेळघर अंगणवाडीत बालकांचे शैक्षणिक साहित्य, आहार आदींची माहिती घेतली. डॉ. दिलीप आंबोळे, महादेवी आडसुळे यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, प्राचार्य सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा. गंगासागर चोले यांनी नियोजन केले.
-----------------
02785
मुंगुरवाडी : नौकूडकर हायस्कूलमध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याला आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
मुंगुरवाडीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
दुगूनवाडी : मुंगुरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील नौकुडकर हायस्कूलच्या २००२-२००३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. माजी मुख्याध्यापक ए. आय. रेडेकर अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक ए. सी. देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला ६० विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांतर्फे रेडेकर, देशमाने, जी. ए. रणदिवे, भाऊसाहेब शिंगटे, एम. डी. येळूरकर, व्ही. वाय. कापसे, डी. आर. भंगे, आर. जी. देसाई, सी. बी. निकम, एम. ए. कानडे, पांडुरंग गुरव, कृष्णा कोष्टी यांचा सत्कार झाला. रेडेकर, सूर्यकांत कांबळे, सीमा कांबळे, चाळोबा देसाई, अश्विनी टक्केकर, नरेंद्र कुपेकर यांची भाषणे झाली. अजित होडगे, नरेंद्र कुपेकर यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे नियोजन केले. अमोल होडगे यांनी स्वागत केले. चारुशीला देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. शशीकुमार भंगे यांनी आभार मानले.