हरळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम
हरळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम

हरळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम

sakal_logo
By

02793
हरळी बुद्रूक : शासन आपल्या दारी कार्यक्रम प्रसंगी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली. या वेळी बाबासाहेब वाघमोडे, पी. के. पाटील, रजनी चंदनशिवे उपस्थित होते.

हरळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
हरळी, ता. १४ : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंबायोसिस स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला.
ग्रामपंचायत सदस्य शशिकांत चौगुले यांनी स्वागत केले. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी प्रास्ताविक केले. ६०२ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, योजनांचे धनादेश, प्रमाणपत्र, सातबाराचे वितरण झाले. हरळीचे तलाठी संतोष पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार झाला. आमदार पाटील यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आपण आहोत. त्यामुळे त्यांची कामे वेळेत निर्गत करा, अशी सूचना केली. शरद मगर, हरळी खुर्दच्या सरपंच साधना आयवाळे यांचीही भाषणे झाली.
हरळी बुद्रूकच्या सरपंच निलम कांबळे, हसुरवाडीच्या सरपंच कोमल भोसमोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष आंबी यांनी सूत्रसंचालन केले. वैरागवाडीचे सरपंच पी. के. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महागावच्या मंडलाधिकारी रजनी चंदनशिवे, तलाठी संतोष पाटील यांच्यासह महागाव मंडलातील तलाठी, पोलिस पाटील, धान्य दुकानदार यांनी परिश्रम घेतले.