
सामान्यांच्या हितासाठी समाजवादाची गरज
02811
गडहिंग्लज : समाजवादी प्रबोधिनीच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. भरत सोलापुरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर साताप्पा कांबळे उपस्थित होते.
सामान्यांच्या हितासाठी समाजवादाची गरज
डॉ. भरत सोलापुरे; गडहिंग्लजला समाजवादी प्रबोधिनीचा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : भांडवलशाही व्यवस्थेमुळे सहकार चळवळ, कामगार संघटनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सामान्य माणसाचे हित जपण्यासाठी आणि वंचितांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी समाजवादी विचारसरणी काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डॉ. भरत सोलापुरे यांनी केले.
समाजवादी प्रबोधिनीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील शाखेतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले होते. गरज समाजवादाची या विषयावर डॉ. सोलापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य साताप्पा कांबळे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सोलापुरे म्हणाले, ‘‘स्वयंशिस्त मानणारी, सर्वांना समान महत्व देणारी समाजवादी विचारसरणी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात भारताने समाजवादी समाजरचना स्वीकारल्याने देशाचा समतोल आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास होण्यास मदत झाली. पायाभूत सुविधांचा विकास घडून आला. पण, १९९१ नंतर नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार केल्यामुळे गरीबी, बेरोजगारी, आर्थिक विषमतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.’’
डॉ. काशिनाथ तनंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित अध्यक्ष साताप्पा कांबळे व उपाध्यक्षा उर्मिला कदम यांचा सत्कार केला. माजी आमदार श्रीपतराव शिंदे, शिवाजी होडगे, अनिल उंदरे, अशोक पट्टणशेट्टी, आप्पासाहेब कमलाकर, एस. आर. कांबळे, गणपतराव पाटोळे, पुंडलिक रक्ताडे, उज्ज्वला दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उर्मिला कदम यांनी आभार मानले.