आजरा ः आजरा तालुका संघात सतारुढ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आजरा तालुका संघात सतारुढ विजयी
आजरा ः आजरा तालुका संघात सतारुढ विजयी

आजरा ः आजरा तालुका संघात सतारुढ विजयी

sakal_logo
By

02823
आजराः विजयी मिरवणुकीमध्ये विजयाची खुण दाखवतांना सतारुढ आघाडीचे प्रमुख पदाधिकारी (छायाचित्र - श्रीकांत देसाई आजरा).
...

आजरा तालुका संघामध्ये सतारुढ गटाची बाजी

एकहाती विजय ः विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभव, समर्थकांचा जल्लोष

आजरा, ता. १४ ः आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सतारुढ श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने सर्वच १९ जागा जिंकत एकहाती विजय मिळवला. व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रतिनिधी, विमुक्त जाती, भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग व अनुसुचित जाती, जमाती प्रतिनिधी या गटात सुमारे १४६० ते २३०० मताधिक्याने सतारुढ आघाडीचे उमेदवार विजयी झाले. विरोधी श्री. रवळनाथ शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. सतारुढ आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष करत शहरात विजयी मिरवणूक काढली.
तालुका शेतकरी संघासाठी सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक झाली. चुरशीने ७६ टक्के मतदान झाले. एकूण १९ जागांसाठी ४२ जण निवडणूक रिंगणात होते. सत्ताधारी श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी विरोधात श्री. रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी असा दुरंगी सामना झाला. इतर संस्था गटातील पहिला निकाल हाती आला. या गटामध्ये सताधारीचे उमेदवार उदयराज पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर सेवा संस्था प्रतिनिधी गटातील निकाल लागला. याही गटातील सर्वच सात जागा सत्ताधारी गटाने जिंकल्या. सताधारी विरोधी आघाडीला २४ मतदान केंद्रांवर कुठेही विशेष मताधिक्य मिळाले नाही. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सताधारी आघाडीने घेतलेली आघाडी कायम राहीली. सताधारी श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले. विरोधी श्री. रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात अशी ः- अ वर्ग सेवा संस्था गट- विठ्ठलराव देसाई (५५), सुनिल देसाई (५४), दौलती पाटील (५४), महादेव पाटील (५३), राजाराम पाटील (५३), महादेव हेब्बाळकर (५२), अल्बर्ट डिसोझा (४८), ब वर्ग इतर संस्था गट- उदयराज पवार (८७).
व्यक्ती सभासद गट- सुधीर देसाई (४७८२), मधुकर देसाई (४६०८), मधुकर यल्गार (४४२५), गणपती सांगले (४४२४), ज्ञानदेव पोवार (४३८२), रविंद्र होडगे (४३७३). महिला प्रतिनिधी गट- राजलक्ष्मी देसाई (५०७२), मायादेवी पाटील (४७८८). इतर मागास गट - संभाजी तांबेकर (४८९८), भटक्या विमुक्त जाती - जमाती- महेश पाटील (५२२४), अनुसुचित जाती- जमाती - गणपती कांबळे (५०४७).
....

प्रमुख विजयी- प्रमुख पराभूत

प्रमुख विजयी- जिल्हा बॅंक संचालक सुधीर देसाई, विद्यमान अध्यक्ष मधुकर देसाई, माजी सभापती उदयराज पवार, अल्बर्ट डिसोझा.
प्रमुख पराभूत- जिल्हा बॅंक माजी संचालक अशोक चराटी, नगरसेवक अभिषेक शिंपी, अनिरुध्द केसरकर, जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा गुरव, सुनिता रेडेकर