जनतेकडून होणारा सत्कार प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेकडून होणारा 
सत्कार प्रेरणादायी
जनतेकडून होणारा सत्कार प्रेरणादायी

जनतेकडून होणारा सत्कार प्रेरणादायी

sakal_logo
By

02868
आजरा : येथे सहाय्याक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांचा सत्कार शिवाजी गुरव यांच्या हस्ते झाला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जनतेकडून होणारा
सत्कार प्रेरणादायी
सुनिल हारुगडे; आजऱ्यात पोलिसांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १४ : जनतेकडून होणारा सत्कार प्रेरणादायी आहे. पोलिसांना जनतेतून पाठिंबा मिळत असेल तर पोलिस नव्या उर्मीने काम करतील. पोलिसांविषयी असणारा जनतेतील आकस कमी होवून पोलिस जनतेचे चांगले मित्र होतील, असे मत आजरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारगुडे यांनी व्यक्त केले.
आजरा तालुक्यातील खानापूर येथे पडलेला सशस्त्र दरोड्याचा बारा तासाच्या आत तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करत मुद्दे माल जप्त करण्याची यशस्वी कारवाई केल्याबद्दल आजरा पोलिसातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारती विविध सामाजिक संघटना व जनतेतर्फे हा कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते.
सर्व श्रमिक संघटना, श्रमिक मुक्तीदल, गुरव समाज संघटना, महामार्ग बाधीत संघटना, मुक्तीसंघर्ष समिती, अंनिस, धरणग्रस्त संघटना, भूमीहीन संघटना, जनसेवा सामाजिक संस्था आरदाळ, खानापूर ग्रामस्थ यांच्यातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी गुरव यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट केला. हारगुडे म्हणाले, ‘‘आजरा तालूक्यातील जनतेतून होणारा सत्कार, पुरस्कारापेक्षा मोठा आहे. या कामगिरीसाठी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. गडहिंग्लज, नेसरी, चंदगड व आजरा पोलिसांनी दरोडेखोर पकडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संपूर्ण टीम मुळे दरोडेखोर हाती लागले. याचप्रमाणे हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना अटक करण्यास यशस्वी झालो. तालुक्यातील युवकांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून सरकारी सेवेत यावे. यासाठी गावागावातील वाचनालयांनी पुढाकार घ्यावा. सहकार्य राहील.’’ हारगुडे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, हवालदार दत्तात्रय शिंदे, संतोष घस्ती, कॉन्सटेबल सुनील कोईगडे, विशाल कांबळे, चालक परशुराम कोळी, अनिल तराळ यांचा सत्कार झाला. नारायण भंडागे, नामदेव गुरव, शिवाजी इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
आजऱ्याचे निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, प्रल्हाद गुरव, हनमंत गुरव, सुमन कांबळे, सुदाम गुरव, एकनाथ जाधव साहेब, युवराज जाधव, महादेव ढोकरे, साळगावचे सरपंच भैया पाटील, सरपंच परिषदेचे राज्य प्रदेश सरचिटनीस राजाराम पोतणीस, कासार कांडगावचे माजी सरपंच शिवाजी गुरव, निवृत्ती मिसाळ आदी उपस्थित होते. संजय घाटगे यांनी आभार मानले.