गुरू शिष्य मेळावा

गुरू शिष्य मेळावा

02887
...

आयटीआयच्या माजी विद्यार्थ्यांचा
गुरु- शिष्य स्नेहमेळावा

कोल्हापूर ः आयटीआयच्या १९८९ -९० च्या बॅचच्या मशिनिस्ट ग्राइंडर या विभागातील विद्यार्थ्यांचा गुरू- शिष्य स्नेहमेळावा नुकताच झाला. या स्नेह मेळाव्याला शिक्षक शंकर भोला यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘जीवनामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरी करणे क्रमपात्र आहे. परंतु आपण स्वतःच्या पायावर उभे राहून छोटासा का होईना एखादा व्यवसाय सुरू करावा व त्या माध्यमातून बेरोजगार लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, हे पहावे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने गरजू गरीब लोकांना आपल्याला शक्य होईल इतकी आर्थिक मदत करावी.’ ३२ वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच ३५ शिष्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सूत्रसंचालन महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार शिवाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक विष्णू सावंत यांनी केले. सचिन बारटक्के यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक मारुती पाटील, शशांक मकोटे, प्रभाकर जांभळे, बाजीराव पोवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com