महा

महा

02959

शैक्षणिक प्रगतीबरोबर आरोग्याकडे
लक्ष द्यावे ः एम.बी. गरगटे

कोल्हापूर, ता १४ ः. जीवनाच्या वाटचालीत दूरदृष्टी ठेवून एकाग्रतेने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. आवडीप्रमाणे शिक्षणाचे क्षेत्र निवडून जीवनात जे काय कराल ते चांगले करा. ते करत असताना गुरुंना आदर्श मानून वाटचाल करा. चारित्र्यसंपन्न जीवन जगा. शैक्षणिक प्रगतीबरोबर आरोग्याकडे लक्ष द्यावे, प्रत्येक क्रीडाप्रकारात उत्तुंग यश मिळवा.महाविद्यालयाचा लौकिक वाढवा असे आवाहन आ.दे.शि.प्र.मंडळाचे सचिव एम.बी. गटगटे यांनी केले. ते महावीर महाविद्यालयात आयोजित स्वातंत्र्यसैनिक कै. भूपाल सुखदेव पांगिरे पुरस्कृत देशभूषण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.
यावेळी कला, क्रीडा, सांस्कृतिक, एनसीसी, एनएसएस तसेच क्रीडा विभागातील विविध क्रीडा क्षेत्रातील ३८ विद्यार्थांना क्रीडा पुरस्कार तर इतर शाखेतील २० विद्यार्थ्यांना देशभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
गरगटे म्हणाले, ‘महावीर महाविद्यालयातील खेळाडू विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर हमखास यश मिळवून गुणवत्ता सिद्ध करतात. सॉफ्टबॉलपटू स्वप्नाली वायदंडे हिने कोरिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्वप्नालीच्या रुपाने आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविला आहे.’
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. पी लोखंडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी करून दिली. क्रीडा पुरस्काची उदघोषणा डॉ. बाबासाहेब उलपे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील, प्रा.संध्या जाधव यांनी केले. डॉ. रोहित पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com