अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन घडावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन घडावे
अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन घडावे

अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन घडावे

sakal_logo
By

ich151.jpg
02970
इचलकरंजी : विविध परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
-------------------
अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन घडावे
स्वप्नील आवाडे; इचलकरंजीत विविध परिक्षांतील यशस्वितांचा सत्कार
इचलकरंजी, ता. १५ : प्रशासकीय सेवेमध्ये जाणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील सामान्य माणूस आपल्या डोळ्यासमोर ठेवून न्याय मार्गाने काम करावे. अधिकाराबरोबरच माणुसकीचे दर्शन आपल्याकडून घडावे, असे प्रतिपादन स्वप्नील आवाडे यांनी केले.
ते दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटना, आर. पी. पाटील ॲकॅडमी, दिगंबर जैन बोर्डिंगतर्फे आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यात बोलत होते. दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, जैन बोर्डिंग चेअरमन रविंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, आर. पी. पाटील, प्रा. ए. ए. मुडलगी, ए. ए. मासुले, सुभाष बलवान, बी. बी. हुपरे, बाळासाहेब केटकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे होते. इचलकरंजी मँचेस्टर शहराबरोबरच खेळामध्येसुद्धा पुढे आहे. तसेच स्पर्धा परीक्षेमध्येही शहरातील विद्यार्थी यशस्वी व्हावेत त्यासाठी सहकार्य करु. होतकरू मुलांना कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेतर्फे कर्जही उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. विविध परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यामध्ये भारतीय रेल्वेमध्ये वर्ग -२ निवड झालेला विशाल कोरवी, भारतीय रेल्वेमध्ये वर्ग- ३ निवड झालेला सिद्धू पिरगोंडे, सी. ए. परीक्षेत यश मिळवलेला प्रवीण जत्राटे, श्री साई समर्थ फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार मिळाल्याने प्रशांत बिरनाळे यांना गौरवले. स्वागत व प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पार्श्वनाथ पाटील यांनी केले. आभार बी. बी. हुपरे यांनी मानले.