‘संत गजानन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संत गजानन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
‘संत गजानन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

‘संत गजानन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

gad153.jpg
02969
गडहिंग्लज : स्नेहमेळाव्यासाठी संत गजानन पॅरामेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------
‘संत गजानन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
गडहिंग्लज, ता. १५ : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॅरामेडिकल कॉलेजच्या २००० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. ३५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. २३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने स्नेहमेळाव्याला प्रारंभ झाला. मृत वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्गमित्र-मैत्रिणींनी परिचय करुन दिला. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. संग्राम आपके यांनी सूत्रसंचालन केले. पवन देसाई यांनी आभार मानले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी अमित पाटील, शिवम तांबेकर, अमर पाटील, विजय अवडन, सीमा तांबेकर यांनी परिश्रम घेतले.