
तोडणी-ओढणी करारांना झाला प्रारंभ
gad154.jpg
02980
हरळी : गोडसाखर कारखान्यातर्फे येत्या हंगामासाठी तोडणी-वाहतूकदारांच्या कराराला प्रारंभ केला. यावेळी प्रकाश चव्हाण, विद्याधर गुरबे, अक्षय पाटील, अशोक मेंडुले, शिवराज पाटील आदी उपस्थित हेाते.
----------------------------------------------------------------
तोडणी-ओढणी करारांना झाला प्रारंभ
गोडसाखर कारखाना; आगामी हंगामात पाच लाख टन गाळपाचे उद्दीष्ट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यातर्फे (गोडसाखर) आगामी गळीत हंगामासाठी तोडणी-ओढणीचे करार करण्यास आज प्रारंभ केला. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालकांच्या हस्ते वाहनधारकांना करार सुपूर्द केले. यावेळी आगामी हंगामात पाच लाख टन गाळपाचे उद्दीष्ट असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
गतवर्षीच्या हंगामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध न झाल्याने हंगाम बंद राहिला. निवडणुकीनंतर अध्यक्ष प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील नव्या संचालक मंडळाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करण्यासाठी धडपड सुरु केली. त्याला यश आले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्याला १०२ कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. यातून आगामी हंगाम वेळेत सुरू होण्याच्यादृष्टीने तोडणी-ओढणी अॅडव्हान्स व कारखान्याची इतर कामे करण्यासाठी तत्काळ ३० कोटींचे कर्ज देण्याची बँकेने संमती दर्शवली आहे. यामुळे आज कारखान्याकडून तोडणी-ओढणी यंत्रणेचे करार करण्यास सुरुवात केली. उपाध्यक्ष श्री. चव्हाण, संचालक विद्याधर गुरबे, अक्षय पाटील, शिवराज पाटील, अशोक मेंडुले, भरमू जाधव, काशिनाथ कांबळे, अरुण गवळी, प्रकाश पाटील, बसवराज आरबोळे, सचिव मानसिंगराव देसाई, शेती अधिकारी एल. बी. देसाई, फायनान्स मॅनेजर आर. पी. जोशी, प्रशासकीय अधिकारी एस. व्ही. हरळीकर, गणपतराव डोंगरे, तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.
-----------
येत्या हंगामात कारखान्याचे पाच लाख टन गळिताचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी लागणारी ओव्हर हॉलिंगची कामे कामगारांनी समन्वयाने व वेळेत पूर्ण करावीत. सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवावा. उत्पादकांना अधिकाधिक दर देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करु.
-प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष, गोडसाखर