बार्बेक्यू नेशन मध्ये बिर्याणी फूड फेस्टिव्हल

बार्बेक्यू नेशन मध्ये बिर्याणी फूड फेस्टिव्हल

03006
बार्बेक्यू नेशनमध्ये
बिर्याणी फूड फेस्टिव्हल 

कोल्हापूर, ता. १५  : खवय्यांच्या आवडीच्या बार्बेक्यू व बिर्याणी फूड फेस्टिव्हलला हॉटेल सयाजी येथील बार्बेक्यू नेशनमध्ये सुरुवात झाली. २१ मे दरम्यान चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातील खाद्य संस्कृतीसह खास अशा बार्बेक्यू व बिर्याणीचा आस्वाद घेता येणार आहे.  
या फूड फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व पेयांची निवड आवडीनुसार करता येणार आहे.  तसेच विविध प्रकारचे मॅरिनेड केलेले कबाब आणि बार्बेक्यू बरोबरच स्थानिक आणि परदेशातील पेयांचा आस्वाद घेण्यात येणार आहे.  भारतातील विविध ठिकाणी तयार होणाऱ्या भट्टी दी तंगडी, खीरी कबाब, शर्मिली मच्छी, अमृतसरी फ्राय पंखुडी, टुंडे कबाब, गोश्त चापली कबाब, कच्चे गोश्त की बिर्याणी, रान बिर्याणी, डिम्मर रोस्ट बिर्याणी, मुर्ग बेगमती, मटन तार कोरमा, मुर्ग आफरीन, दम पुख्त गोश्त या व अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. सोबतच मखाना की खीर, मलाई पेढा, राज भोग, शाही गुलाब फिरनी, मड केक स्लाईस, रोस्टेड आमंड ब्राऊनी, कॅरेमलाईज्ड बनाना केक, व्हाईट फॉरेस्ट टार्ट आणि रोज मिल्क पुडिंग अशा डेसर्टसचा समावेश आहे.शेफ निशांत आणि त्यांची टिम या फेस्टिव्हल दरम्यान भेट देणार्‍या लोकांसाठी ही विशेष मेजवानी तयार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com