मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्तच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्तच
मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्तच

मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्तच

sakal_logo
By

मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्तच
आरटीई प्रवेश प्रक्रिया; गडहिंग्लजला १०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. गडहिंग्लज तालुक्यातील २० शाळांत १०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आठ दिवसांच्या मुदतवाढीनंतरही ३२ जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आरटीई प्रवेशाबाबत पालकांत जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे दिसून येते.
आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. पहिलीच्या प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थी आरटीईचा लाभ घेऊ शकतात. आरटीईतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे शुल्क माफ होते. मात्र, प्रवास, शैक्षणिक साहित्यासह शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या इतर सुविधांचे शुल्क द्यावे लागते.
मात्र, आरटीई प्रवेशाबाबत पालकांत सजगता नसल्याचे दिसून येत आहे. आरटीई प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदत होती. या कालावधीत गडहिंग्लज तालुक्यातील २० शाळांतील १४१ पैकी १०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. शासनाने पुन्हा आठ दिवसांची मुदतवाढ दिली होती. आज ही मुदत संपली. मुदतवाढीच्या कालावधीत पाच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. अद्याप ३२ जागा रिक्तच राहिलेल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेला मिळणारा थंडा प्रतिसाद लक्षात घेता आरटीई प्रवेशाबाबत पालकांत जागरुकता निर्माण करण्याची गरज दिसून येत आहे.